PM Kisan 21st Installment Update | देशभरातील शेतकऱ्यांसाठी अंदाजे बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 21 व्या हप्ता आता कधीही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो. परंतु एक अट म्हणजे या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची e kyc पूर्ण असणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचा हप्तांमध्येच अडकू शकतो असं स्पष्ट इशारा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना केला आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबरी! PM Kisan योजनेचा 21 वा हप्ता या दिवशी खात्यात, तुमचं नाव आहे का?
सध्या लाखो शेतकरी 21 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत वीस हप्ते पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. वर्षभरात सरकार या योजनेअंतर्गत एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देते. हा लाभ प्रत्येकी तीन हप्त्यामध्ये दोन–दोन हजार रुपये च्या स्वरूपामध्ये दिले जाते.

कोणत्या शेतकऱ्याला मिळतो pm Kisan योजनेचा लाभ ?
पूर्वी 2 हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्यांनाच हा लाभ होता. मात्र आता जमिनीचे क्षेत्रफळ कितीही असो, नाव जमीन अभिलेखात असल्यास लहान मोठे सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
21 वा हप्ता कधी जमा होणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजे साधारणतः 15 नोव्हेंबर पर्यंत कधीही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेले नाही तरी तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे. सरकारने आता शेतकऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहे ज्या शेतकऱ्याची e kyc पूर्णा असेल अशा शेतकऱ्यांना हप्ता दिला जाणार आहे.
PM Kisan e kyc प्रक्रिया कशी करावी ?
- सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
- आपला आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक टाका
- स्टेटस तपासताना जर e kyc बाकी असेल तर त्या ठिकाणी e kyc येथे क्लिक करा.
- यानंतर तुमच्या अधिकृत आधार क्रमांक वरती OTP ओटीपी येईल त्या ठिकाणी टाका.

CSC केंद्र वर जाऊन सहज करा e kyc
तुमच्या गावामधील सीएससी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या आवश्यक कागदपत्रांची गरज पडणार आहे.
1.आधार कार्ड
2. बँक पासबुक
3. जमिन कागदपत्रे
एकदा तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली तर पुढील हप्ते तुमच्या खात्यावरती आपोआप जमा होणार आहेत.

देशातील अन्नदाते शेतकऱ्यांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेचे माध्यमातून देशातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. ही योजना तुमची हक्काची आहे त्यामुळे तुमच्या हक्काचे पैसे वेळेवर मिळावे त्यासाठी काही मिनिटे काढून ही E kyc प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबरी! PM Kisan योजनेचा 21 वा हप्ता या दिवशी खात्यात, तुमचं नाव आहे का?
