Monsoon Update 2026 : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे जगभरातील हवामानामध्ये मोठा बदल घडणार आहे यामुळे 2026 चा मान्सून कसा राहणाऱ्या बाबत एक मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. जगातील हवामानात मोठे बदल घडवणारा एल निनो पुन्हा सक्रिय होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आलेली आहे. जागतिक हवामान संघटना (WMO) च्या ताज्या अंदाजानुसार जुलै 2026 दरम्यान एल निनो सक्रिय होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये तापमान वाढ, पावसाचे असमान वितरण आणि हवामानात मोठी उलथापालक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. Monsoon Update 2026
एल निनो म्हणजे काय?
एल निनो हा प्रशांत महासागरातील एक महत्त्वाचा हवामान घटक आहे. त्यामध्ये विश्ववृत्त प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान सामान्य पेक्षा जास्त वाढते. या बदलामुळे जगभरातील वाऱ्यांचे प्रवाह आणि पाऊस तापमान वारे यावर मोठा परिणाम होतो. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलं तर समुद्र गरम झाला की हवामान बिघडते आणि त्याचा परिणाम पावसावर आणि तापमानावर होतो.
WHO चा ताजा अंदाज काय सांगतो ?
जागतिक हवामान संघटनेच्या माहितीनुसार, सध्या प्रशांत महासागरात तापमान झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे एल निनो ची सुरुवात अपेक्षा पेक्षा लवकर म्हणजे मे जुलैमध्ये होऊ शकते. WHO चे हवामान तज्ञ विलाफ्रान ओकिया त्यांनी सांगितले की, सुरुवातीला ENSO स्थिती तटस्थ होते. आता बहुतेक हवामान मॉडेल एल निनो सक्रिय होण्याचे संकेत देत आहेत. पुढील काही महिन्यात त्यांची तीव्रता वाढू शकते.
मात्र एल निनो किती तीव्र होईल याबाबत अजून निश्चित अंदाज देणे कठीण असल्याचं सांगितलं जात आहे.
भारतावरती काय परिणाम होऊ शकतो?
एल निनो चा भारताच्या मान्सूनवर मोठा परिणाम होतो. सामान्यता एल निनो सक्रिय असतांना मान्सून कमकुवत पाडण्याची शक्यता असते. यंदा संभाव्य परिणाम असू शकतात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकते. काही भागात दुष्काळाची स्थिती निर्माण होऊ शकते. तापमानात वाढ होऊन उष्णताच्या लाटा वाढू शकतात. शेती आणि जलस्रोतांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषता जून सप्टेंबर या मान्सून कालावधीत पावसाचे वितरण असामान्य राहू शकते.
जगभरात कुठे काय परिणाम?
एल निनो प्रभा फक्त भारतातच नाहीतर हा जगाच्या हवामानावर परिणाम करतो. दक्षिण अमेरिका आणि अमेरिका जास्त पाऊस, आफ्रिका आणि मध्य आशियात काही भागात अतिवृष्टी, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका या देशात दुष्काळाची परिस्थिती. युरोप आणि उत्तर आफ्रिका यामध्ये तापमान वाढ.
पुढील तीन महिने का महत्त्वाचे?
मे जुळणे जुलै हे महिने हवामानाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत. कारण या काळात जमिनीचे तापमान सामान्य पेक्षा जास्त राहू शकते. उष्णतेच्या लाटा वाढू शकतात. पावसाच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल दिसू शकतो. त्यामुळे हवामान विभाग आणि शेतकरी दोघांसाठी हा का अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
हे पण वाचा : गुड न्यूज! राज्यातील शेतकऱ्यांना ₹1229 कोटा विमा मंजूर? यामध्ये तुम्ही पात्र आहात का चेक करा
