Pik vima News 2026 | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. म्हणजे पिक विमा योजनेबाबत. खरंतर शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. कधी अतिवृष्टी अवकाळी पाऊस दुष्काळ तर कधी नैसर्गिक आपत्ती अशाच परिस्थितीमध्ये शासना शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात त्यापैकी एक म्हणजे पिक विमा योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा उत्तराला जातो. याच पिक विमा अंतर्गत जर शेती पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. सतत याच पीक विम्या योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट आलेली आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Pik vima News 2026
काय आहे नवीन अपडेट
तर आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनांतर्गत 1229 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर झालेला आहे आणि सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झालेला आहे. परंतु ही बातमी नक्कीच खरे आहे का शेतकऱ्यांना खरंच इतक्या रुपयांचा निधी मिळणार आहे का की नुसती प्रसार माध्यमांमध्ये ही अफवा पसरवत आहे चला तर जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती.
शेतकरी बांधवांनो सर्वात आधी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठल्याही अफेवल बळी न पडता एक गोष्ट लक्षात घ्या की शासन ज्यावेळेस कोणता ही निर्णय घेते त्यापूर्वी शासनाचा शासन निर्णय जीआर येतो पण अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो पिक विमा कंपनीकडून किंवा शासनाकडून असा कुठलाही निधी मंजूर झालेला नाही शासनाने जी शेतीचे नुकसान झाले होते त्याचे नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले आहे परंतु अद्याप पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही.
हे पण वाचा : पिक विमा योजनेमध्ये मोठे बदल ! केंद्र सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय नेमका कोणता ?
सध्याच्या घडीला परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की शेतकऱ्यांनी पिक विमा भरताना भरलेले रक्कम देखील निघणे मुश्किल झालेले आहे. तर पिक विमा तर लांबची गोष्ट आहे. शासनाने अद्याप असा कुठलाही निर्णय जाहीर केलेला नाही. शेतकरी बांधवांनी अशा कुठल्याही अफेला बळी पडू नये. शासनाने नुकसान भरपाईची आकडेवारी जाहीर केलेली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील देण्यात आली. तसेच पिक विमा कंपनीकडून देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे परंतु ही नुकसान भरपाई कधी मिळते याकडे पाहण्यासारखे राहणार आहे अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या व्हिडिओ सविस्तर पहा.
