Weather update | भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा हवामान अंदाज वर्तवला आहे. हा हवामान अंदाज खरंच मोठा टेन्शन वाढवणारा ठरणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहे. याचा कालपासूनच वातावरण मोठा बदल झालेला आहे तर दुपार होताच आभाळ काळ होतो आणि वाऱ्यांचा वेग वाढतो. काही ठिकाणी पावसाचा सरी सुरू होतात सध्या महाराष्ट्रात हवामानाचा पूर्ण गोंधळ सुरू आहे. Weather update
आजच्या अंदाजानुसार राज्यावरती पुन्हा एकदा दुहेरी संकट उभा आहे. एकीकडे उष्णतेची लाट नागरिकांना हैराण करते तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे यांचा इशारा देण्यात आलेला आहे.
विशेषता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दक्षिण कोकणातील जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे. या भागात दुपारनंतर अचानक वातावरण बदलून मेघा गर्जनेसह हलक्यातील मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 40 ते 50 किमी वेगाने वाऱ्या वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा गरजेचा आहे.
दुसरीकडे उत्तर कोकणातील काही भागात आणि विदर्भातील काही भागात परिस्थिती वेगळीच आहे जिथे अजूनही उष्णतेचा कहर कायम आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणे म्हणजे स्वतःला उष्णताचा धोक्यामध्ये टाकणं. त्यामुळे प्रशासनाने 12 ते चार दरम्यान घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.
तर मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण कोकणातील काही भागात पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा काळ नीट समजून घेऊन योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. कारण काढलेले पीक आंबा बाग आणि भाजीपाल्यांच नुकसान होऊ शकतात. त्यामुळे आधीच खबरदारी खूप गरजेची आहे.
एकंदरीतच सध्या हवामानाने पूर्णपणे बदल झालेला आहे. कधी कडक ऊन कधी ढग कधी पाऊस त्यामुळे बाहेर पडताना हवामानाचा अंदाज पाहूनच बाहेर पडा पुढचे काही तास खूप महत्त्वाचे असणार आहे आणि सावध राहणे गरजेचे ठरणार आहे.
हे पण वाचा : विजांपासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबू नका! पंजाबराव डख यांचा कडक सल्ला; अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार!
