SSC HSC Student: राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी दहावी बारावीची परीक्षा दिली आहे. लवकरच या परीक्षेचा निकाल लागणारा असून विद्यार्थी व पालक आतुरतेने निकालाची वाट पाहत आहेत. मात्र यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची काही कारणांमुळे नियमित परीक्षेत बसण्याची संधी हुकते, तर काही जण वैयक्तिक अडचणींमुळे शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी आता पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात परत येण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. राज्य बोर्डाने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे जून-जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
बोर्डाच्या या नव्या नियमानुसार, जे विद्यार्थी नियमित शाळा किंवा कॉलेजमधून परीक्षा देऊ शकत नाहीत, त्यांना आता फॉर्म क्रमांक १७ भरून खाजगीरित्या परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे थांबलेले शिक्षण पुन्हा सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून विद्यार्थ्यांना घरबसल्या नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
नोंदणी करताना विद्यार्थ्यांनी आपला सध्याचा पत्ता, जिल्हा, माध्यम आणि शाखा यानुसार उपलब्ध असलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांची निवड करावी लागणार आहे. या यादीतून एक संस्थेची निवड करून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. एकदा नोंदणी पूर्ण झाली कीच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार आहे. नोंदणी शुल्क देखील ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. शुल्क भरल्यानंतर त्याची पावती विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होईल. ही पारदर्शक प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी सोयीची ठरणार आहे. नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही संपूर्ण प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली असून, शाळाबाह्य राहिलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी ही विशेष संधी देण्यात आली आहे. SSC HSC Student दरम्यान, जून-जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी ही नोंदणी लागू राहणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपली नोंदणी केलेली नाही, त्यांनी वेळ न दवडता लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे. ही संधी गमावली तर पुन्हा एक वर्ष थांबावे लागू शकते.
आजच्या स्पर्धात्मक काळात शिक्षण खूप महत्त्वाचे झाले आहे. एका छोट्याशा चुकामुळे किंवा परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी बोर्डाने घेतलेला हा निर्णय खरोखरच विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही संधी ओळखून योग्य वेळी पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे आहे.
