Maharashtra Rain Update | राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक मोठा हवामान अंदाज समोर आलेला आहे. कारण राज्यावरती पुन्हा एक मोठ संकट कोसळल आहे. सकाळपासूनच कडक ऊन आणि लाही लाही करणारी उष्णता वाढली आहे. तर दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होणार आहे आणि क्षणातच मुसळधार पाऊस पडू शकतो अशी शक्यता सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. याच पार्श्वभूमी वरती हवामान खात्याने काही जिल्ह्यांना विशेष अलर्ट दिलेला आहे नवीन अंदाजामध्ये काय विशेष अलर्ट आहे हे एकदा पण जाणून घेऊया. Maharashtra Rain Update
हवामान खात्याचा अलर्ट (Meteorological Department alert)
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि काही इतर भागात रविवार नंतर अचानक वादळी पावसाने हजेरी लावली काही लोकांचे अक्षरशः धावपळ उडाली आहे. तर सातारा जिल्ह्यात परिस्थिती अधिकच गंभीर होत चाललेली आहे. जावळी तालुक्यातील ओझर गावात जिल्हा परिषद शाळेचे भिंत कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर रामनगर परिसरामध्ये मोठ वडाचे झाड कोसळल्याने हॉटेल आणि शेड तसेच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे पडली विजांच्या तारांवर परिणाम झाला आहे. सध्याच्या घडीला नागरिकांमध्ये एक भीतीच वातावरण निर्माण झालेला आहे.
याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मेघगर्जना सह जोरदार पावसाने धडक दिली आहे. तुरळत भागात काही वेळात जोरदार पाऊस कोसळल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावले हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्ट अक्षरशः खरा ठरला. दुपारनंतर सुरू झालेला या पावसाने आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नाम केलेला आहे. कारण एप्रिल महिन्यातील हापूस आंबा हंगाम अगदी शेवटच्या टप्प्यात असताना या अवकाळी पावसामुळे मोठ्या नुकसान होण्याची भीती सध्या व्यक्त केली जाते.
चिपळूण मध्ये देखील अगदी असा चित्र निर्माण झाल आहे. सकाळपासूनच प्रचंड उकडा जाणवत होता. पण दुपारी अचानक वातावरण बदल झाल्यामुळे अवघ्या काही मिनिटातच मुसळधार पावसाने शहराला जोडपून काढलं. परंतु उन्हाच्या तीव्रतेमुळे जे लोक हैराण होते त्यांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र हा पाऊस धोकादायक ठरलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि सावंतवाडी परिसरातही ढगांच्या गडगडाट सह पावसाच्या सरी कोसळल्या तर सकाळी अंग भाजणार उन्हाचा तडाका आणि संध्याकाळी अचानक पाऊस अशा बदलत्या हवामानामुळे नागरिक सध्याच्या घडीला हैराण झालेले आहेत.
हवामान विभागाने पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याचा इशारा दिलेला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे विशेषता विजांच्या कडकडाच्या वेळी घराबाहेर न पडणे झाडाखाली उभं राहणे आणि वाहन सुरक्षित ठिकाणी उभी करणे आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे.
तर उष्णतेची लाट आणि दुसरीकडे अचानक कोसळणारा उपाय पाऊस या दुहेरी संकटामुळे महाराष्ट्रात सामान्य नागरिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सगळे चिंतेमध्ये आहेत येणारे दोन दिवस खूप महत्त्वाचे मानले जात असून हवामानाचा हा लहरीपणा अजून किती दिवस त्रास देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
हे पण वाचा : आज हवामान हवामानात झाला मोठा बदल, या जिल्ह्यांना तातडीचा मोठा संदेश वाचा सविस्तर
