WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM किसानचा 21 वा हप्ता लॉक! उद्या दीड वाजता 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे तुमचा हप्ता अडकणार नाही ना?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Latest Update Today | देशभरातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याची तारीख आणि वेळ अखेर निश्चित झाली आहे. स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2000 रुपयांचा हप्ता जमा करणार आहेत. यासाठी ई-केवायसी अनिवार्य असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.

दुपारी दीड वाजताच थेट पैसे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली

यावेळी निधीच्या वेळेबाबत कोणताही गोंधळ राहू नये म्हणून सरकारने खुलासा केला आहे. बुधवार, दुपारी बरोबर दीड वाजता पंतप्रधान मोदी एका क्लिकवर लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जारी करणार आहेत. शेतकऱ्यांसाठी खते, बियाणे, औषधे आणि पिकांच्या खर्चात हे पैसे मोठा आधार ठरणार आहेत.

किसान उत्सव दिवस शेतकऱ्यांसाठी खास साजरा होणार दिवस

सरकारने यावेळी फक्त निधीचे वितरण न करता हा दिवस “किसान उत्सव दिवस” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना थेट संबोधित करतील. देशाच्या कृषी क्षेत्राप्रती सरकारची बांधिलकी दाखवणारा हा खास सोहळा असेल.

त्याचबरोबर काही आपत्तीग्रस्त राज्यांतील हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर शेतकऱ्यांना ही रक्कम आधीच जमा करण्यात आली आहे, जेणेकरून संकट काळात त्यांना तातडीची मदत मिळावी.

9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 18,000 कोटींचा लाभ

या 21 व्या हप्त्यात देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट फायद्याचा डिस्बर्सल होणार आहे. एकूण 18,000 कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.
लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी हा हप्ता कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीच्या गरजा भागवण्यासाठी मोठा PM किसानचा 21 वा हप्ता लॉक! उद्या दीड वाजता 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे तुमचा हप्ता अडकणार नाही ना? ठरणार आहे.

तुमचे पैसे अडकू नयेत आजच करा हे 3 काम!

उद्या हप्ता खात्यात सुरक्षित पोहोचण्यासाठी तुमचा ई-केवायसी अपडेट असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक शेतकऱ्यांचे हप्ते केवळ या कारणाने अडकले आहेत.

ई-केवायसी करण्याचे तीन सोपे मार्ग:

1️⃣ पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन स्वतः ई-केवायसी पूर्ण करा
2️⃣ जवळच्या CSC केंद्रावर भेट देऊन बायोमेट्रिक KYC करून घ्या
3️⃣ मोबाइलवरून ओटीपीद्वारे त्वरित पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा

शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

शेतकरी कुटुंबांसाठी दिवसेंदिवस वाढणाऱ्या शेती खर्चात PM किसान योजना मोठा आधार आहे. सरकारच्या या निर्णयाने पुन्हा एकदा शेतकरी केंद्रस्थानी असल्याचे स्पष्ट केले आहे. उद्याचा किसान उत्सव दिवस अनेकांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!