Gas cylinder New Rules News | गॅस सिलेंडर धारकांसाठी एक महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आलेली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर बाबत वारंवार अनेक बातम्या समोर येत आहेत. गॅसचा तुटवडा येणार का कारण मध्यपूर्व तणाव वाढल्या असल्यामुळे बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये जास्त पसरत आहेत आणि लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आता गॅस सिलेंडर मिळणे कठीण होईल आणि या सगळ्यावर आता सरकारने स्पष्ट शब्दात उत्तर दिलेला आहे आणि थोडासा दिलासा देखील दिलेला आहे. Gas cylinder New Rules News
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशभरामध्ये सध्या गॅसचा कोणताही तुटवडा नाही. उलट 90% एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू झालेला आहे म्हणजेच सध्या तरी गॅस मिळणार नाही अशी भीती बांधण्याची काही गरज नाही. कारण परदेशातून येणारे गॅस टँकर नियमितपणे देशात पोहोचत आहेत.
परंतु इथे एक महत्त्वाचा बदल झाला आहे आता गॅस सिलेंडर बुक करताना काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ओटीपी सिस्टम म्हणजेच जर तुम्ही गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर नोंदणी असलेल्या नंबर वरती एक ओटीपी येईल तो दिल्याशिवाय सिलेंडर मिळणार नाही. अनेकदा दुसऱ्याच्या नावावरती सिलेंडर घेतला जातो किंवा एजन्सी मध्ये गोंधळ होतो हे टाळण्यासाठी हा नवीन नियम लागू केलेला आहे. Gas cylinder New Rules News
आता दुसरी मोठी अपडेट म्हणजे छोट्या कुटुंबासाठी आणि कामगारांसाठी पाच किलोचे छोटे गॅस सिलेंडर सुरु करण्यात आलेले आहेत. हे सिलेंडर फक्त ओळखपत्र दाखवून घेता येणार आहेत त्यासाठी पत्त्याचा पुरावा लागत नाही. शहरात कामासाठी आलेल्या ग्राहकांना किंवा एकटे राहणाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार 14 मार्चपासून आत्तापर्यंत लाखो टन गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात आलेला आहे. शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, अन्नप्रक्रिया उद्योगाच्या महत्त्वाच्या ठिकाणी 100% गॅस पुरवठा सुरू आहे. म्हणजेच अत्यावश्यक सेवांमध्ये कुठेही अडथळे निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
तर या शिवा आणखी एक मोठा बदल म्हणजे सरकार आता PNG गॅसचा वापर करणार आहे. ज्या भागात पीएनजी ची सुविधा उपलब्ध आहे तिथल्या लोकांना एलपीजी सोडून पीएनजी कडे वळण्याचा सल्ला दिला जातो. भविष्यातील LPG वरचा ताण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.
सध्या सर्व बातमी वरती विश्लेषण केल्यावर ती सध्या गॅसचा तुकडा नाही पण नियम कडक झालेला आहे त्यामुळे पुढील सिलेंडर बुक करताना तुमचा मोबाईल नंबर अपडेट आहे का हे एकदा नक्की चेक करा नाहीतर ओटीपी येणार नाही आणि सिलेंडरही मिळणार नाही म्हणून घाबरू नका पण थोडं सावध राहा कारण नियम आता बदलले आहेत जुनी पद्धत चालणार नाही.
हे पण वाचा : सरकारने आता घरगुती गॅस सिलेंडरवर लावले नवीन नियम, हे नियम पाहिले तरच मिळणार गॅस
