WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्र सरकारकडून दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! हा महत्त्वाचा निर्णय ठरणार खास

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DA NEWS | आता दसरा झाला आहे आता यानंतर भारतातील सर्वात मोठा सण आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा असलेला दिवाळी सण हा अगदी दारात आला आहे. याच पार्श्वभूमीवरती मोदी सरकारने लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. नेहमी दिवाळीच्या सणाला सरकारकडून काहीतरी मोठे गिफ्ट मिळतं, बोनस आणि महागाई भत्ता दोन्ही वाढवले आहेत हे असे दोन मोठे गिफ्ट सरकारकडून मिळाला आहे.  

हे पण वाचा | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! LIC आणि दिल्ली विद्यापीठांमध्ये निघाली मोठी भरती, असा करा अर्ज 

सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीमध्ये यावर्षी कर्मचाऱ्यांना तीस दिवसांचा बोनस मिळणार असून, त्यासोबतच महागाई भत्ता (DA) आणि महागाई राहत (DR) यामध्ये तीन टक्के वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे डीए 55% वरून थेट आता 58% करण्यात आला आहे. तर ही वाढ एक जुलै 2025 पासून लागू होणार असून, ऑक्टोबरच्या पगारात कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचा इयर मिळणार आहे. म्हणजे जुलै, ऑगस्ट सप्टेंबर चा एकत्रित लाभ थेट हातात मिळणार. सरकारने या आदि मार्च महिन्यातील दोन टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे 2025 हे वर्ष कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच ठरले.

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी जबरदस्त बोनस

DA NEWS
DA NEWS


रेल्वे विभागात काम करणाऱ्यांसाठी हा तर मोठा बोनस आहे एक प्रकारचा जॅकपॉट म्हणलं तरी हरकत नाही. केंद्र सरकारने 78 दिवसांच्या Productivity Linked Bonus (PLb) ला मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त ₹17,951 रुपयांचा बोनस मिळाला आहे. हा निर्णय सुमारे अकरा लाख नॉनगॅजीटेड रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लाभदायिक ठरणार आहे. यात ट्रॅक मेंटनर, लोको पायलट, स्टेशन मास्टर, गार्ड अशा सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हे पण वाचा | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुनी पेन्शन योजना पुन्हा होणार लागू, 6 महत्त्वाचे शासन निर्णय 

तसेच रेल्वे सह केंद्र सरकारच्या ग्रुप C आणि नॉन गॅजेटेड ग्रुप B कर्मचाऱ्यांनाही 30 दिवसांच्या पगारा एवढा बोनस मंजूर झाला आहे. हा निर्णय 29 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना सणासुदीचा दिलासा मिळालाय. GST विभागात मात्र बोनस फक्त क्लरिकल पदावरील कर्मचाऱ्यांनाच मिळतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोनस दिला जात नाही, अशी माहिती वरिष्ठ अधिकारी मुकेश कुमार यांनी दिली.

DA NEWS
DA NEWS

उत्तर सरकारी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी नर्सेसना त्यांच्या बेसिक पगारांनुसार बोनस मिळतो. मात्र Junior Resident Doctors (JR) यांना बोनस दिला जात नाही. ESIC हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मात्र यावर्षी बोनस मिळणार नाही, अस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल आहे.

हे पण वाचा | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुनी पेन्शन योजना पुन्हा होणार लागू, 6 महत्त्वाचे शासन निर्णय 

परंतु महागाई भत्ता म्हणजे काय कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पगारावर मिळणारा तो एक अतिरिक भाग आहे. जो वाढत्या महागाईमुळे त्यांची खरेदी क्षमता टिकून ठेवतो. म्हणजेच बाजारात वस्तूंचे किमती वाढल्या, तरी सरकार हा भत्ता देऊन कर्मचाऱ्यांचे जीवनमान स्थिर ठेवतो. उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याला बेसिक पगार ₹18,000 असेल, तर DA वाडी नंतर त्यांच्या पगारात ₹540 ची वाढ होईल आणि ऑक्टोबर मध्ये एकत्रित ₹1,620 रुपयांचा एरियर मिळेल.

DA NEWS
DA NEWS

( Disclaimer: वरील दिलेली ही माहिती प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही. योग्य माहिती जाणून घेण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी अधिकृत वेबसाईटला फॉलो करावे तसेच अशाच अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला.)

Leave a Comment

error: Content is protected !!