LPG Gas Cylinder New Update: एलपीजी धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जगभरात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस आणि तेलाच्या किमतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणने होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा केली असून तब्बल 47 दिवसानंतर हा मार्ग सुरळीत करण्यात आला आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांना दिलासा मिळाला असून. भारतातील सर्वसामान्य नागरिकांना सध्या एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजे आता एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त होणार का? आपण याच प्रश्नाचे उत्तर आज जाणून घेणार आहोत.
होर्मुझची समुद्रधुनी ही केवळ एक जलमार्ग नसून अनेक महत्त्वाच्या देशांसाठी ऊर्जा पुरवण्याचे साधन आहे. अनेक देशांमध्ये येणारे तेल आणि एलपीजी गॅस याच मार्गाद्वारे आयात निर्यात केला जातो. याच मार्गाद्वारे भारतासारखा मोठा देश एलपीजी आयात करतो त्यामुळे हा मार्ग बंद झाल्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. मात्र आता हा मार्ग पुन्हा सुरळीत सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का नाही? हे पाहण्यासारखे राहणार आहे.
अमेरिका इराण युद्धामुळे हा मार्ग जवळपास बंद करण्यात आला होता. परिणामी गॅस पुरवठ्याचा साठा खूप कमी झाला होता त्यामुळे कंपन्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या सर्वांचा थेट परिणाम गॅस सिलेंडरच्या किमतीवर दिसून येत होता. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर झपाट्याने वाढले होते. दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांच्या स्वयंपाक घराचे बजेट आणखीन बिघडले होते. आता हा मार्ग पुन्हा सुरू झाल्यामुळे गॅस सिलेंडरचे दर पुन्हा कमी होतील अशी अपेक्षा आहे.
आता होर्मुझ सुरू झाल्यामुळे काही प्रमाणात चित्र सुधारलेले दिसेल अशी अपेक्षा व्यक्त केले जात आहे. शिपिंग खर्च आणि विमा दर कमी होण्याची शक्यता असल्यामुळे गॅस सिलेंडरचे दर देखील कमी होऊ शकतात. मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्यामुळे गॅस सिलेंडरचे दर लगेच कमी होतील असे नाही. कारण परिस्थिती पूर्णपणे सामान्य झालेली नाही. LPG Gas Cylinder New Update
इराणच्या हल्ल्यामुळे रास लफान सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पावर मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जागतिक बाजारात गॅसची उपलब्धता अजूनही कमी आहे. तज्ज्ञांच्या मते हे नुकसान भरून काढण्यासाठी काही वर्ष लागू शकतात त्यामुळे गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू होईपर्यंत किमतीवर दबाव राहण्याची शक्यता आहे. भारतासाठी ही परिस्थिती अधिक संवेदनशील आहे. देशात मोठ्या प्रमाणात गॅस पुरवठा आयात केला जातो त्यामुळे जागतिक स्तरावर याची किंमत स्थिर होईपर्यंत दर कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
मात्र तरी देखील सकारात्मक गोष्ट म्हणजे होर्मुझ मार्ग खुला झाल्यामुळे भारताला आता पर्यायी मार्गावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. यामुळे कंपन्यांना स्वस्त दरात गॅस सिलेंडर खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. हळूहळू पुरवठा सुरळीत सुरू झाला तर काही महिन्यात गॅस सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणात घसरू देखील शकतात. मात्र सध्या एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त होण्यासाठी आणखीन काही वेळ वाट पाहावी लागू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात जागतिक घडामोडीवर एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती अवलंबून राहतील.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
