Unseasonal rain damage 2025 : राज्यामध्ये अनेक भागात मुसलधार पावसाने थैमान घातले आहे. मराठवाड्यातील बीड, संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि पुण्यात देखील मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. या जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे तर तब्बल 7–8 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, या पावसामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

शेतीमध्ये पाणी साचल्यामुळे, सर्व उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर पिक वाहून गेले आहे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतजमीन खडून वाहून गेले आहेत. पिक हातामध्ये याने आधीच मातीमोल झाले आहे शेतकऱ्याच्या शेतामध्ये आता फक्त चिखल आणि शेतकऱ्याचे अश्रू उरलेले दिसत आहेत. अशी परिस्थिती सध्या मराठवाड्यातील अनेक पूरग्रस्त भागांमध्ये निर्माण झाली आहे.
मराठवाड्यातील अनेक शेतकरी या झालेल्या अतिवृष्टीमुळे, उघड्यावर आले आहेत. पिक विमा ,हमीभाव, कर्जमाफी, अशा सर्व गोष्टींनी शेतकरी पहिल्यांदाच परेशान होता. आणि आता अशा मध्येच पावसामुळे शेतकरी अधिकच अडचणी मध्ये आला आहे, त्यामुळे सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसान भरपाईची रक्कम थेट खात्यामध्ये जमा करावी अशी मागणी शेतकरी आणि अनेक आमदार कडून होत आहे.

भाजप आमदार सुरेश धस यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाख रुपये पर्यंत ची मदत द्यावी अशी मागणी केली आहे. व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील शेतकऱ्यांची लवकरात लवकर मदत करण्यात यावी अशी मागणी सरकारपुढे मांडली आहे.
अनेक राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी आंदोलन देखील केले आहेत. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेने वळा दुष्काळ आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी हमीभाव या अनेक मुद्द्यांवर आंदोलन करत सरकारला जाब विचारले आहे.
या सगळ्या प्रश्नावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे ते म्हटले की दिवाळीपूर्वीच नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. सध्या राज्यभरात शेतीच्या नुकसानाचे पंचनामे सुरू असून त्यावर तातडीने मदत केली जाणार आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत त्यांनी कोणती माहिती दिली नाही ते म्हणाले की ओला दुष्काळ बाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील.

शेतीमध्ये आता उरलेले चिखल आणि निराशा, आशा काळामध्ये सरकारने दिलेल्या दिवाळीपूर्वी भरपाईच्या आश्वासनामुळे शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळाला आहे पण फक्त घोषणा नव्हे तर प्रत्यक्षात मदत मिळणं अधिक गरजेचे आहे.
आज सरकारने दिलेली शब्द पाळणाही फक्त एक जबाबदारी नसून शेतकऱ्यांच्या जीवनात आश्चर्य किरण करणार आहे ओला दुष्काळ पिके ओळीत निसर्गाची आपत्ती नाही तर लाखो कुटुंबाची उध्वस्त झालेली स्वप्न आहेत त्यामुळे केवळ पंचनामे आणि आश्वासन न करता तातडीने यावर एक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Discelaimer :
वरील लेखांमध्ये दिलेली माहिती विविध वृत्तश्रोतावर, अधिकृत निवेदने व माध्यमातील बातमीवर आधारित आहे या लेखाचा उद्देश केवळ माहिती पुरताच आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान संबंधित मदत भरपाई किंवा शासकीय योजने संबंधित निर्णय अटी व रक्कम यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो.

