Ration Card News | राज्यातील रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे दिवाळीपूर्वी शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. जरी शासनाने आनंद शिधा बंद केला असला तरी हा निर्णय राज्यातील रेशन कार्ड धरकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. सरकारकडून यंदा महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत असून राज्यातील तब्बल 19 जिल्ह्यांमध्ये शिधापत्रिकाधारकांना यंदा गव्हा ऐवजी ज्वारी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. काय आम्ही भाकरीवर दिवाळी करायची का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. Ration Card News

मागच्या तीन वर्षापासून शासनाच्या माध्यमातून याच रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा म्हणून चहा पावडर, साखर, डाळ, तेल अशा वस्तूंचं वाटप केलं जायचं. लोकांनाही सणाची चाहूल लागायची. पण यंदा मात्र हा शीधा रद्द करण्यात आला आहे. त्यातच गहू ऐवजी ज्वारी देण्याचा निर्णय आल्याने लोकांमध्ये गोंधळ उडालेला आहे. काही ना आनंद झाला आहे ज्वारी आरोग्यासाठी बरी आहे, तर काहीजण म्हणतात गव्हाची सवय असताना आता ज्वारीची भाकर कोणी कशी खावी?
पुरवठा विभागाने सांगितले की राज्यात मागच्या हंगामात ज्वारीचे उत्पादन प्रचंड झाल आणि त्याची खरेदी ही मोठ्या प्रमाणात झाली. पण ती साठवणुकीतून अडकून राहिली होती. त्यामुळे सरकारने ठरवले की ही ज्वारीच आता जनतेला स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत वाटायची. ऑक्टोबर महिन्यापासून हे वाटप सुरू झालं असून काही जिल्ह्यात डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.
या जिल्ह्यांची यादी जाहीर!
शासनाने जाहीर केलेल्या यादीमध्ये हिंगोली, बुलढाणा, नांदेड, अकोला, जळगाव, धाराशिव, बीड, परभणी, लातूर, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नागपूर, नाशिक नंदुरबार हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यातील लाखो लाभार्थ्यांना गव्हाऐवजी ज्वारी मिळणार आहे.

राशन कार्डधारकांना दर महिन्याला या योजनेतून 35 किलो धान्य दिला जातो त्यात पंधरा किलो गहू आणि २० किलो तांदूळ असतो. पण यंदा ते बदलून 7.5 किलो गहू, 7.5 किलो ज्वारी आणि २० किलो तांदूळ असं नवं प्रमाण ठरला आहे. तर प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी एक किलो गहू एक किलो ज्वारी आणि तीन किलो तांदूळ मिळणार आहे.
अनेक गावात मात्र या निर्णयाबद्दल चर्चेला उदान आलेला आहे काही वृद्ध मानतात, आमचं पोट गव्हावर चालतं, ज्वारीची सवय नाही. तर काहीजण म्हणतात गव्हाचे दर वाढले म्हणून सरकारला हिशोब बसवायचा आहे. तर तरुण वर्ग म्हणतोय किमान काहीतरी मिळतंय त्यातही ज्वारी आरोग्यासाठी चांगली. आता दिवाळी जवळ आली आहे आणि गहू गावी लोकांच्या एकच वाक्य यंदाची दिवाळी गोड नाही भाकरीचीच राहणार!
