WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway Bharti 2025 | 10 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! पहा अर्ज करण्याची शेवटची तारीख किती ? 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway Bharti 2025 :  आजच्या या बेरोजगारीच्या काळामध्ये प्रत्येक  तरुणाच्या डोक्यावर एक मोठी चिंता असते ती म्हणजे सरकारी नोकरी, गावा गावातील शेतकरी घरात मुलगा असो किंवा शहरातील मध्यवर्गीय घरातील मुलगा असो प्रत्येक करा आपला पोट भरण्यासाठी एक चांगली नोकरी मिळावी अशी अपेक्षा असते. सरकारी नोकरी म्हणजे अजूनही एक मोठेपणाचे प्रतीक मानले जाते त्यात जर नोकरी रेल्वे सारख्या मोठ्या खात्यात मिळाली तर सोन्याहून पिवळ , रेल्वेमध्ये नोकरी म्हणजे फक्त नोकरी नव्हतं समाजातल्या प्रतिष्ठेचा एक वेगळं चिन्ह असतं. 

Railway Bharti 2025
Railway Bharti 2025

 आता अशीच एक  सुवर्णसंधी रेल्वे भरती बोर्डाकडून  आली आहे. ईस्ट सेंट्रल रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत तब्बल 1149 जागा उपलब्ध करून देण्यात आले आहे या भरतीसाठी अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध झाली आहे अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून, जर तुम्ही देखील या नोकरीची वाट पाहत होतात त्यासाठी ही एक मोठी बातमी ठरणार आहे.

 कोण करू शकतो अर्ज ? 

या भरतीसाठी  अर्ज करणारा उमेदवार  किमान 10 वी उत्तीर्ण  असला पाहिजे. त्याचबरोबर संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. म्हणजेच  शिक्षणानंतर आयटीआयचा कोर्स केलेल्या तरुणांना ही मोठी संधी असणार आहे. अनेक वेळा गावातील शाळेतून दहावी पास झाल्यानंतर मुलं आयटीआय ला जातात आणि त्यांना पुढे नोकरी कुठे मिळेल या विचारात असतात. अशा मुलांसाठी ही भरती म्हणजे नशीबातला एक मोठा  टप्पा ठरणार आहे. 

Railway Bharti 2025
Railway Bharti 2025

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्याचे वय किमान 15 वर्षे तर जास्तीत जास्त 24 वर्षे असले पाहिजे.  मात्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादित सरकारने दिलेली सवलती लागू होणार आहे, ग्रामीण भागातील गरीब घरातील मुलाचे अनेकदा वयोमर्यामुळे नोकरीच्या शर्यतीत मागे राहतात त्यांच्यासाठी ही सूट खूप महत्त्वाची असणार आहे. 

निवड प्रक्रिया कशी असणार ? 

 अनेक नोकरीसाठी परीक्षा ,मुलाखत, आणि तयारीचा मोठा खर्च असतो त्यामुळे उमेदवारांना अडचणी निर्माण होतात. परंतु या भरतीत तसं काहीच नाही कारण या अप्रेंटिस पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवाराची निवड ही थेट त्यांच्या आयटीआय मध्ये मिळालेल्या कोणाच्या आधारे होणार आहे म्हणजेच याने आयटीआय मध्ये मेहनत करून चांगले गुण प्राप्त केले आहेत अशा विद्यार्थ्यांना थेट रेल्वे अप्रेंटिस म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. 

या प्रक्रियेमुळे अभ्यासू आणि गरीब मुलांनाही संधी मिळणार आहे कारण जास्त कोचिंग फी देऊन मोठे क्लास लावून त्यांच्यासाठी शक्य नाही त्यामुळे सरळ कोणाचे आधारे निवड होणार आहे. या कारणामुळे अनेक घरांमध्ये आनंद वातावरण निर्माण झाले आहे. 

Railway Bharti 2025
Railway Bharti 2025

निवड झाल्यानंतर उमेदवारांना फक्त नोकरीच नाही तर ट्रेनिंगची सुवर्णसंधी दिली जाणार आहे. म्हणजेच उमेदवार प्रत्यक्ष रेल्वेत काम करताना शिकणार अनुभव घेणार आणि भविष्यातील नोकरीच्या दृष्टीने आपली एक नवीन ओळख तयार करणार आहे. अनेक तरुणांना पहिल्या नोकरीतील अनुभव नसल्यामुळे पुढे नोकरी मिळवण्यात अडचण येते. 

अर्ज प्रक्रिया कशी असणार

आजच्या डिजिटल युगात अर्ज करणे अगदी सोपे झाले आहे, इच्छुक उमेदवारांना सर्वप्रथम www.ecr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन या लिंक वर क्लिक करून आपली सर्व माहिती भरून घ्यायची आहे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला फॉर्म ची प्रिंट आऊट स्वतः जवळ ठेवायची आहे. 

Railway Bharti 2025
Railway Bharti 2025

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे आता उमेदवाराला शहरात धावपळ करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या गावातील ऑनलाईन सेंटरमध्ये जाऊन सहजपणे अर्ज करू शकता. अर्ज भरताना तुम्हाला अर्ज शुल्क म्हणून शंभर रुपये द्यावी लागणार आहे, व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला आणि दिव्यांग उमेदवारांना कोणताही अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख किती ? 

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, 25 ऑक्टोबर 2025 आहे. म्हणजेच अजून पुन्हा महिना आहे पण नेहमीप्रमाणे शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नका कारण अनेकदा शेवटी फॉर्म भरताना साईड डाऊन होते आणि अनेक उमेदवार यापासून वंचित राहतात. त्यामुळे शक्य तितक्या लवकर तुम्ही तुमचा अर्ज भरून घ्यावा. 

Leave a Comment

error: Content is protected !!