Pm Kisan Yojana 21th Hapta : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या पीएम किसान (Pm Kisan Yojana 2025) योजनेबाबत. कारण आता 20 वा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकरी म्हणत आहेत 21 वा आता कधी येईल. काही प्रसार माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार आज आपल्याला काही मोठी अपडेट मिळाली आहे त्यानुसार 21 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हस्तांतरित केला जाईल अशी माहिती समोर आलेली आहे. परंतु या योजनेची सविस्तर माहिती आतापर्यंत मिळालेले हप्ते आणि पुढचा आता कधी मिळणार त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा. Pm Kisan Yojana 21th Hapta

पीएम किसान योजना काय आहे (What is PM Kisan Yojana?)
शेतकऱ्यांना शेती करत असताना, अनेक मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते. यामध्ये नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी, शेतातील पिक वाया जाणे, बाजार भाव योग्य न मिळणे, पूर परिस्थिती अशा संकटांना तोंड येत असताना शेतकरी हैराण होतो. कधीकधी शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात. आणि आत्महत्या करतात. अनेक वेळी काही प्रकरण समोर येतात काही येत नाहीत अशावेळी शेतकऱ्यांना काही आर्थिक आधार देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून योग्य उपक्रम राबवले जातात. कधी कधी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देखील दिले जाते तर कधी पिकांचे नुकसान भरपाईसाठी अनुदान देखील दिले जाते.
परंतु अशाच परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना थोड्या फार मदतीची गरज पुरावी म्हणून शासनाने एक मोठा उपक्रम राबवलेला आहे. तो म्हणजे मोदी सरकारने 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी राबवलेली PM किसान योजना या योजनेअंतर्गत देशातील छोट्या आणि सीमात शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. यामध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार (₹6000) रुपयांची थेट आर्थिक मदत त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. ही मदत वर्षाकाठी तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. (प्रत्येकी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना ₹2000 रुपये मिळतात.) मात्र, हा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही. काही ठराविक अटी आहेत.

यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे शासकीय नोकरी आहे. (मध्यम व उच्चस्तरीय कर्मचारी, अधिकारी). तसेच आयकर भरणारे शेतकरी किंवा त्यांचे कुटुंबीय. तसेच डॉक्टर, इंजिनीयर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट यासारखे व्यावसायिक तसेच राजकारणातील नगरसेवक, खासदार, आमदार यासारखे लोकप्रतिनिधी. आणि संविधानिक पदाधिकारी जसे की माजी मंत्री, माजी अध्यक्ष. मोठ्या जमिनीचे व्यावसायिक शेतकरी ज्यांच्या शेतीवर मुख्य व्यवसाय नसतो.
यामध्ये शेतकरी बांधवांना एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे जमीन शेतकऱ्यांच्या नावावर असणे आवश्यक आहे. दुसरी म्हणजे जमीन वडिलांच्या नावावर असून शेतकऱ्याच्या नावावर अद्यावत नसेल, तर लाभ मिळत नाही. आणि नाव बँक खाते, आधार कार्ड आणि जमीन नोंदणी म्हणजे सातबारा यामध्ये एकसारखे असणे गरजेचे आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांना Pm किसान योजनेचे किती हप्ते मिळाले? (How many installments of PM Kisan Yojana have farmers received so far? )
काही प्रसार माध्यमांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, 19 वा हप्ता 14 फेब्रुवारी 2025 रोजी जारी करण्यात आला तर 20 वा हप्ताह 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला. त्यानंतर आता शेतकऱ्यांना पुढच्या हप्त्याची म्हणजे 21व्या (Pm Kisan Samman Nidhi Yojana 21 Installment 2025) हप्ते ची आतुरता लागलेली आहे हा हप्ता कधी जमा होणाऱ्या कडे शेतकरी डोळे लावून बसलेले आहेत.

शेतकऱ्यांना Pm किसान योजनेचा 21 वा हप्ता कधी मिळणार? (When will farmers get the 21st installment of PM Kisan Yojana?)
शेतकऱ्यांना दिवाळी जवळ आली आहे आणि सगळी कडे खरेदी आणि गजबज सुरू झालेली आहे. पण याच दरम्यान तुमचे खिशात पैसे येणार का याची मोठी चर्चा सध्या रंगात आहे. कारण पी एम किसान सन्मान निधी (Pm Kisan Samman Nidhi Yojana 21 Installment 2025) योजनेचा 21 वा हप्ता केव्हा मिळणार याकडे राज्यातील आणि देशातील लाखो शेतकरी पाहत आहेत. सरकारने आत्तापर्यंत 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती यशस्वीरित्या जमा केलेले आहेत. पुढचं आता केव्हा येणार असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे देवयानी म्हणजे सणासुदीच्या काळात सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरवर्षी सरकारी या योजनेतून शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत देते आणि ती तीन हप्त्यांमध्ये मध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये अशी मिळते. पण यामध्ये एक नियम आहे, हा हप्ता साधारणपणे चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जातो. त्यामुळे गेल्या वर्षीचा अनुभव पाहिला तर दिवाळीच्या तोंडावरती हप्ता मिळेल अशी शक्यता फारशी नाही.
सध्या काही तज्ञांचे मते व प्रसारमाध्यमांच्या मते असा अंदाज बांधवला जातोय की डिसेंबर महिन्याच्या आसपास हा हप्ता सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाईल. पण अधिकृत घोषणा अजून देखील झालेली नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी असल्या कुठल्याही अफेंवरती विश्वास ठेवू नका, कारण सरकारकडून येणाऱ्या अपडेटवरच भरोसा ठेवणे गरजेचे आहे. तसेच योजनेच्या पुढील अपडेट साठी आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही शेतकऱ्यांसाठी बनवलेले आहे कुठलीही अफवा पसरवली जात नाही योग्य रित्या प्रसार माध्यमांच्या आधारे आणि सरकारच्या सूचनानुसार बनवलेली आहे.)
1 thought on “शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! या दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 वा हप्ता आली मोठी अपडेट”