WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! पेन्शन आणि रिटायरमेंटच्या नियमामध्ये बदल ? दिवाळी होणार गोड 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pension News 2025 | केंद्र सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी दिली आहे. ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक आहे, आतापर्यंत सेवानिवृत्तीनंतर पेन्शन आणि इतर लाभ मिळवण्यासाठी अनेक महिन्यापर्यंत कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. पण आता ही समस्या दूर होणार आहे सरकारच्या नव्या आदेशानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला निवृत्ती पूर्वी दोन महिने आधीच पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजेच (PPO) देणे बंधन करण्यात आले आहे. 

हे पण वाचा| EPFO New Rules 2025 | कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गिफ्ट ,आता PF मधून 100% पैसे काढता येणार जाणून घ्या नवीन नियम?

Pension News 2025
Pension News 2025

या प्रक्रियेत सर्वात मोठा बदल म्हणजे आता प्रत्येक विभागात पेन्शन मित्र किंवा कल्याण अधिकारी नेमला जाणार आहे . हा अधिकारी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला अर्ज भरण्यापासून ते आवश्यक कागदपत्र जमा करण्यापर्यंत मदत करणार आहे. एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन मिळून देण्याची जबाबदारी देखील यात अधिकाऱ्यावर असणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा मोठा त्रास कमी होणार आहे.

हे पण वाचा| EPFO New Rules 2025 | कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गिफ्ट ,आता PF मधून 100% पैसे काढता येणार जाणून घ्या नवीन नियम?

डिजिटल पारदर्शकतेसाठी सरकारने ‘भविष्य ’ नावाचं पोर्टल सुरू केला आहे. सर्व मंत्रालय आणि विभाग या पोर्टलची जोडले गेले आहेत, त्यामुळे पेन्शनची सर्व प्रकरण आता ऑनलाईन पाहता येणार आहे तसेच कर्मचाऱ्यांची सर्विस बुक e -HRMS वर डिजिटल स्वरूपात ठेवली जाणार असल्याने कागदपत्राची पूर्तता करणे अधिक सोपं होणार आहे. 

Pension News 2025
Pension News 2025

आतापर्यंत चौकशी सुरू असल्यास पेन्शन थांबत होती. पण आता त्या  नियमातही बदल करण्यात आला आहे चौकशी सुरू असली तरी कर्मचाऱ्याला तात्पुरती पेन्शन दिली जाणार आहे. सीसीएस पेन्शन नियम 2021अंतर्गत आता प्रत्येक कर्मचाऱ्याला निवृत्ती पूर्वी किमान दोन महिने आधी PPO किंवा e – PPO जारी करणे बंधनकारक आहे सरकारचा उद्देश स्पष्ट आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला सन्मानपूर्वक आणि तणावमुक्त निवृत्तीचा अनुभव झाला पाहिजे. 

Pension News 2025
Pension News 2025

आजवर आपल्या हक्कासाठी वर्षानुवर्षीय प्रतीक्षा करणारे अनेक निवृत्त कर्मचारी आहेत.  पण या नव्या पद्धतीमुळे आता ती वाट पहावी लागणार नाही खरंतर ही योजना केवळ एक प्रशासकीय सुधारणा नाही तर प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या समनशी निगडित असणार आहे.  त्यामुळे आता पेन्शन धारकांसाठी ही बातमी दिवाळी गिफ्ट आहे असे देखील अनेक नागरिकांनी म्हटले आहे. 

अशाच अनेक नवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!