Maruti Suzuki new cars | नवीन कार घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे, सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे आणि या शुभ मुहूर्तावर अनेक जणांनी विचार केला असेल की एक नवी गाडी घ्यावी, परंतु कोणती गाडी घ्यावी यामध्ये गुंतवून गेलात का ? तर आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकीच्या तीन भन्नाट कार्स बद्दल माहिती देणार आहोत. त्याचबरोबर नुकताच जीएसटी कपातीच्या निर्णयामुळे छोट्या कारच्या किमतीमध्ये कपात झालेली आहे. मध्यवर्गीय कुटुंबाच्या बजेटमध्ये बसणाऱ्या गाड्या आता आणखी स्वस्त झाले आहेत.
गेल्या काही वर्षात पेट्रोल डिझेलच्या किमती, महागाई, लोणचे व्याजदर आणि इतर खर्च यामुळे बऱ्याच लोकांनी कार खरेदीची योजना थांबवली होती. पण नव्या जीएसटी बदलामुळे पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे. आता बाजारात उतरणाऱ्या नव्या मॉडल्सलाही या धोरणाचा फायदा झाला आहे.
यात पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी यांनी ग्राहकांसाठी एका मागून एक दमदार ऑफर्स चा वर्षाव सुरू केलाय, नुकतंच कंपनीने आपली नवीन SUV विक्टोरिस बाजारात आणली आहे. आणि आता पुढील दोन वर्षात आणखीन तीन कार्स लॉन्स करण्याची तयारी सुरू झाली .
मारुती फ्रॉन्क्स हायब्रिड
कंपनी पहिल्यांदा स्वतःची HEV सिरीज हायब्रीड टेक्नॉलॉजी भारतीय बाजारामध्ये लॉन्च करणार आहे, या तंत्रज्ञानावर आधारित सगळ्या पहिली गाडी असणार आहे. यामध्ये 1.2 लिटरचा z12E पेट्रोल इंजन आणि त्याच सोबत हायब्रीड सिस्टम देण्यात येणार आहे. इंधन बचत लो मेंटेनन्स आणि मायलेजच्या बाबतीत ही कार कमल करणार आहे.
मारुती ई विटारा
मारुती सुझुकीची ही पहिली इलेक्ट्रिक SUV असणार आहे त्यामुळे ग्राहकांचा उत्साह दिसून येत आहे. गुजरातच्या हंसर पूर प्लॉटमध्ये याच उत्पादनही सुरू झाला आहे, पहिले आलेल्या तारखेनुसार या गाडीची लॉन्चिंगचा अंदाज होता की सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2025 मध्ये ही गाडी रस्त्यावर येणार आहे. परंतु आता खात्री लायक माहितीनुसार ही गाडी किंवा 26 च्या सुरुवातीला लॉन्च होणार आहे.
मारुती आता पहिल्यांदाच थेट महिंद्रा आणि हुंडाई यासारख्या कंपन्यांना टक्कर देणार आहे. ही कंपनी प्रीमियर सेगमेंटसाठी एक जबरदस्त सेव्हन सीटर SUV तर करीत आहे. या गाडीची लांबी 4.5 मीटर पेक्षा जास्त असणार आहे त्यामुळे जीएसटी धोरणामुळे तिला आणखी फायदा मिळेल. कुटुंबासाठी मोठी मजबूत आणि लॉंग ड्राईव्ह साठी उपयुक्त अशी ही कार 2027 पर्यंत बाजारामध्ये येणार आहे.
GST धोरणामुळे काय झाला फायदा ?
आतापर्यंत चार मीटर पेक्षा कमी कार्स वर उच्च जीएसटी लागू होत होती, पण नव्या धोरणात हा कर कमी करण्यात आला आहे त्यामुळे मारुती सारख्या कंपन्यांना कार्स कमी किमतीत उपलब्ध करून द्यायचा फायदा मिळाला आहे. जी करा आधी साथ ते आठ लाखापर्यंत येत होती ती आता सुमारे 50 हजार ते 1 लाख रुपयांनी कमी मिळणार आहे.
टीप :
या लेखांमधील माहिती ही विविध माध्यमातून प्राप्त झालेल्या अहवालावर उपलब्ध श्रोतावर आणि अंदाजित बातम्यावर आधारित आहे. वाहनाच्या किमती लॉन्चिंग तारीख किंवा सरकारी धोरणामध्ये कालांतराने बदल होऊ शकतो खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित कंपनीचे अधिकृत वेबसाईट किंवा अधिकृत डीलर करून संपूर्ण माहिती तपासून घेणे आवश्यक आहे.

3 thoughts on “GST बदलाचा मोठा फायदा , मारुती सुझुकीच्या या भन्नाट कार्स घेणार बाजारात एन्ट्री ”