Maharashtra Pik Vima Yojana | गेल्या अनेक दिवसापासून, भारतात हवामानाचा खेळ सुरू आहे. अनेक भागांमध्ये दुष्काळ तर अनेक भागात अतिवृष्टी असे दृश्य पाहायला मिळत आहे. यावर्षी तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे, महाराष्ट्रात त्यातल्या त्यात मराठवाडा सांगली सातारा या भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे.
हे पण वाचा ! शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! या दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 वा हप्ता आली मोठी अपडेट
याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार ‘हवामान आधारित विमा योजना ’ सुरू करण्याच्या तयारीत आहे. या योजनेद्वारे अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, आणि अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसान कमी करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर हवामान बदललाचा सर्वाधिक फटका शेती आणि संबंधित व्यवसायांना बसतो त्यामुळे तात्काळ मदत होणे अत्यंत गरजेचे आहे.

७ ऑक्टोबरला महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीबाबत जाहीर केलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तातडीने मदत देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. जगभर ग्लोबल वार्निंगचा संकट दिवसान दिवस वाढत चालला आहे, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, आणि उत्तर भारतात हवामानाचे स्वरूप पूर्णपणे बदललेले आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचा मोठा नुकसान झाला आहे काही अहवालानुसार हवामान बदलाच्या विपरीत परिणाम भोगावणाऱ्या देशांमध्ये भारताचा 6 वा क्रमांक लागलेला आहे.
पिकांचं, पशुधनाचं, अर्थव्यवस्थेचा, आणि सार्वजनिक सुविधाच नुकसान हे सगळं ग्लोबल वार्निंगचाच परिणाम आहे. पावसाळ्यात दुष्काळ आणि उन्हाळ्यात पावसाळा ही परिस्थिती तज्ञांचे मते हवामान बदलामुळे निर्माण झालेली आहे.
हे पण वाचा ! शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! या दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 वा हप्ता आली मोठी अपडेट
आता या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची ही नवीन योजना म्हणजेच शेतकऱ्यांसाठी मोठा जिल्हासा देणारी आहे. हवामानावर आधारित विमा योजना म्हणजेच ‘Weather Based Insurance Scheme’ ही पारदर्शक आणि वेगवान असेल. यामध्ये सध्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई साठी पंचनामे अहवाल आणि पडताळणी अशी लांब प्रक्रिया करावी लागते ज्यामुळे शेतकऱ्यांना मदत उशिरा मिळते.

परंतु या नव्या योजनेत असं काही होणार नाही, पावसाचं प्रमाण, तापमान किंवा वाऱ्यांचा वेग, ठराविक मर्यादी पेक्षा जास्त किंवा कमी झाल्यास विमा कंपन्या थेट शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा करणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी कोणताही अर्ज किंवा कागदपत्राची गरज लागणार नाही.
एकंदरीतच हवामान बदलाच्या या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना ठरू शकते. बदलत्या काळात शेतकऱ्यांचं पीक वाचवणं म्हणजेच देशाचे भविष्य वाचवणार, त्यामुळे या सर्व योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आणि या निर्णयामुळे शेतकरी वर्गांमध्ये आनंदीच वातावरण निर्माण झाले आहे, आपण अनेक वेळा पाहिलं की शेतकऱ्यांची नुकसान झाले परंतु त्यांना नुकसान भरपाई ही खूप दिवसानंतर मिळत आहे त्यामुळे या योजनेचा चांगलाच फायदा होणार आहे.
हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी बातमी ! राज्यमध्ये लवकरच ओळा दुष्काळ जाहीर करणार? दिवाळीपूर्वी मदतीची शक्यता
Disclaimer : वरील लेखात माहिती विविध वृत्त स्रोत, सरकारी अहवाल आणि उपलब्ध सार्वजनिक माहितीच्या आधारे दिलेली आहे. यातील कोणतीही माहिती ही अधिकृत शासकीय अधिसूचना समजून वापरू नये, योजनेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात त्यामुळे वाचकांनी अंतिम आणि अचूक माहितीसाठी संबंधित सरकार विभागाचे अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. या लेखाचा उद्देश केवळ नागरिकांना माहिती पोचवणे आहे कोणत्याही प्रकारचा आर्थिक किंवा कायदेशीर सल्ला देणे हा हेतू नाही.
