Ladki Bahin Yojana e-KYC : महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आर्थिक मदत मिळावी म्हणून मागील वर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये मानधन दिले जाते, पण हे मानधन सुरू ठेवण्यासाठी आता राज्य सरकारने e kyc करणे अनिवार्य केले आहे. हा नवीन नियम लागू केल्यापासून राज्यभरात लाडक्या बहिणींची झुंबड उडाली आहे.
केली नाही तर मिळणार नाही दिवाळीचा हप्ता ! आता या प्रकारे करा लाडकी बहीण योजनेची kyc

E kyc न झाल्यास थेट मानधन बंद होणार, असं सरकारने जाहीर केला आहे त्यामुळे गावोगावी शहर गावात प्रत्येक ठिकाणी लाडक्या बहिणींनी धुमाकूळ घातला आहे. पण यामध्येच आता मोठ्या प्रमाणात अडचणी देखील निर्माण होत आहे अनेक ठिकाणी सर्वर काम करत नाही तर कधी ओटीपी येत नाही असे अनेक अडचणीला लाडक्या बहिणींना समोर जावे लागत आहे.

अनेक ठिकाणी महिला तासंतास रांगेत उभा राहून ही e kyc पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना चिंता वाढली आहे की आता केवायसी होणार की नाही आणि लाडके बहिणीचा हप्ता बंद होणार का ? असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना येत आहेत. ठाण्यात आयोजित केलेल्या मेळाव्यात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी यावर भाष्य केले आणि महत्त्वाची घोषणा देखील केली आहे.
आदिती तटकरे यांनी केली मोठी घोषणा ?
आदिती तटकरे यांनी ठाण्यात बोलताना म्हटले की, सध्या राज्यातील दररोज चार ते पाच लाख लाडक्या बहिणींची e kyc केली जात आहे. आतापर्यंत एक कोटी दहा लाख हून अधिक महिलांची kyc प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्याचबरोबर पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींना आम्ही पंधरा दिवसाची अतिरिक्त मुदत देणार आहोत. म्हणजे आता पूरग्रस्त झालेल्या भागातील महिलांना पंधरा दिवस अतिरिक्त मुदतवाढ देण्यात आले आहे.

या जिल्ह्यांना 15 दिवस मुदतवाढ !
सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, अशा अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमध्ये ही मुदत वाढ लागू होणार आहे. तर इतर जिल्ह्यांसाठी नोव्हेंबर पर्यंतचा वेळ आधीच देण्यात आला आहे, सरकारकडून सर्वर मध्ये सुधारणा सुरू असून लवकरच अडचणी कमी होतील असा आश्वासन अदिती तटकरे यांनी केले आहे.
हे पण वाचा| E kyc केली नाही तर मिळणार नाही दिवाळीचा हप्ता ! आता या प्रकारे करा लाडकी बहीण योजनेची kyc
या संपूर्ण प्रक्रियेमुळे सामान्य महिलांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असली तरी सरकारने दिलेली मुदतवाढ हा काहीसा दिलासा ठरणार आहे. शेवटी प्रश्न फक्त कागतूपत्रिका आमचा नाही तर बहिणीच्या पोटापाण्याचा त्यांच्या मानधनाचा आणि घर चालवण्याचा आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरळीत होणं हेच आता लाखो लाडक्या बहिणींचा एकमेव अपेक्षित स्वप्न आहे.
केली नाही तर मिळणार नाही दिवाळीचा हप्ता ! आता या प्रकारे करा लाडकी बहीण योजनेची kyc

1 thought on “Ladki Bahin Yojana e-KYC | दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना सरकारचे मोठी गिफ्ट ? E kyc संदर्भात मोठा निर्णय ”