Ladki Bahin Yojana : राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी एक चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. नोव्हेंबरचा हप्ता गेल्याच महिन्यात मिळणे अपेक्षित होते, मात्र नोव्हेंबर संपून डिसेंबरचा अर्धा महिना उलटला तरीही महिलांच्या खात्यात पैसे न आल्याने राज्यभरात नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डिसेंबर महिन्याला आज १७ दिवस पूर्ण झाले असतानाही दोन महिन्यांचा हप्ता रखडल्यामुळे अनेक महिलांच्या घरगुती अर्थकारणावर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. रोजच्या गरजांसाठी, औषधोपचारांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा छोट्या कर्जाच्या हप्त्यासाठी या पैशांवर अवलंबून असलेल्या महिलांमध्ये चिंता वाढली आहे. “नोव्हेंबरचा हप्ता नाही, डिसेंबरचाही नाही, आता दोन्ही पैसे एकत्र मिळणार का?” असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता एक नवी माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार २३ किंवा २४ डिसेंबर २०२५ रोजी दोन्ही महिन्यांचे हप्ते एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे नगरपरिषद निवडणुका पार पडताच दोन ते तीन दिवसांत निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Ladki Bahin Yojana
मात्र, या संपूर्ण घडामोडींवर अद्याप शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे खरंच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का, की पुन्हा काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होतील का, याकडे आता सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य केली असून त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांना पुढील काळात योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ सुरू आहे.
याशिवाय, ई-केवायसी करताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठीही सरकारने एकदाची संधी दिली असून ती सुद्धा ३१ डिसेंबरपर्यंतच आहे. ज्यांनी ई-केवायसी केली आहे पण आधार, बँक खाते किंवा नावातील चुकांमुळे प्रक्रिया अडकल्याची भीती आहे, त्यांना आता ही चूक सुधारण्याची संधी मिळणार आहे.
एकीकडे दोन महिन्यांचे पैसे रखडलेले, दुसरीकडे ई-केवायसीची अंतिम मुदत जवळ आलेली, अशा परिस्थितीत लाडक्या बहिणींची चिंता वाढली आहे. आता शासनाकडून लवकरात लवकर अधिकृत घोषणा होऊन नोव्हेंबर–डिसेंबरचा हप्ता खात्यात जमा होतो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
(टीप: वरील बातमी प्रसार माध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.)

