IT job cuts India | देशातील आयटी क्षेत्रावर काळात आला आहे, काही महिन्यापासून सतत नोकऱ्या कपातीच्या चर्चा सुरू होत आहे. पण आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी दिसत आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस यासारख्या दिग्गज कंपनीची लोक रातोरात नोकरीवरून कमी केले जात आहे. आणि ही फक्त अफवा नाही तर आत मधील सूत्र आणि कर्मचाऱ्यांचे अनुभव आहेत.
12 हजार कि 30 हजार नेमकं किती नोकरी जाणार ?
दोन महिन्यापूर्वी TCS चे CEO के. कृतिवासन यांनी जाहीर केले होते की एकूण कर्मचाऱ्यांपैकी फक्त 2 टक्के लोकांना कमी करण्यात येणार आहे. परंतु हा आकडा साधारण 12000 एवढा होता पण आत्ताच्या माहितीनुसार वास्तवात 30 हजारहून अधिक कर्मचारी नोकरीवर कमी होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

ही संख्या फक्त भारत पुरती मर्यादित नाही तर अमेरिकन धोरण, जागतिक आर्थिक मंदी, प्रोजेक्टची गट आणि नवीन भरतीवर बंदी यामुळे कंपन्या खर्च कपातीच्या मूडमध्ये दिसून येत आहेत.
ट्रम्प यांच्या निर्णयाने मोठा धक्का !
अमेरिका चे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H–1B विजा वरील शुल्क हा 1 हजार डॉलर वरून एक लाख पर्यंत वाढवला आहे हे शुल्क वाढणे म्हणजे भारतातील आयटी कंपन्यांना प्रचंड आर्थिक फटका.
या निर्णयाचा परिणाम काय ?
- अमेरिकन क्लायंटनी कॉन्ट्रॅक्ट्स कमी झाले.
- ऑन साईट काम करण्यावर कंटाळा
- खर्च कमी करण्यासाठी नोकऱ्यात कपात सुरू
- स्टॉक मार्केटमध्ये आयटी कंपनीची घसरण
- 13 वर्षे काम करून देखील बाहेरचा रस्ता
चित्रांच्या माहितीनुसार पुण्यातील एका टीसीएस कर्मचाऱ्याचा अनुभव लोकांना हादरून सोडणार आहे, एका कर्मचाऱ्यांनी सांगितले की मी मागे तेरा वर्षे कंपनीत काम केले माझा प्रोजेक्ट संपला पण नवीन काम मिळालं नाही वेगवेगळ्या टीमशी बोललो पण प्रतिसाद नाही विचार आणि आर एम जी फक्त मेसेज करत राहिले शेवटी मला बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे.

TCS सारख्या स्थिर आणि प्रतिष्ठित कंपनीत लोक सुरक्षित भविष्याची आशा ठेवून वर्षानुवर्षे काम करतात पण आज त्यात कंपनीत परिस्थिती वेगळी निर्माण झाली आहे.
लोक ऑफिसमध्ये भीतीने काम करत आहेत, 10 ते 15 वर्षे सेवा देणारा नाही अचानक बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे .
कुठल्याही क्षणी मला बोलवतील आणि राजीनामा द्यायला सांगतील अशी मानसिकता प्रत्येक कर्मचाऱ्यांची झाली आहे. आतापर्यंत कंपनीने यावर कोणती अधिकृत माहिती दिलेली नाही पण नाव ऑक्टोबरला जेव्हा तिमाही निकाल जाहीर होतील तेव्हा हा विषय उघड चर्चेला येणार आहे.
IT युनियन आणि कर्मचारी संघटना काय म्हणतात ?
आयटी युनियनच असं म्हणणं आहे की, प्रतीक्षात चपातीचा आकडा 12000 नाही तर दुप्पट किंवा तिप्पट असणार आहे. काही कर्मचारी सांगतात की राजीनाम्यावर सही करण्यासाठी दबाव टाकला जातो.
जगातील बदल मात्र भारतावर सावट
AI मशीन लर्निंग आणि ऑटो मिशन मुळे अनेक बेसिक आणि सपोर्ट रोल्स धोक्यात आले आहेत. बिजनेस ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट कमी झालेत कर्मचारी ट्रेन बदललेत कंपन्या आता कमी पण स्किल असलेल्या लोकांना ठेवण्याच्या स्टेटसवर आहे.
आता सर्वांचे नजरा 9 ऑक्टोबर वर
TCS च्या दुसऱ्या तीमाहि चे निकाल नऊ ऑक्टोबर ला जाहीर होणार आहे या दिवशी पहिल्यांदाच कंपनीला यास संपूर्ण वादावर उत्तर द्यावे लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कंपनी हा विषय कमी लेखू शकते, बिझनेस मॉडेल रिप्रायोरिटायझेशन असं देखील या सर्वांना नाव देण्यात येऊ शकते.
Disclaimer:
या लेखांमध्ये दिलेली माहिती, ही एक सामान्य माहितीच्या आधारावर आहे. या लेखातील आकडेवारी अहवाल किंवा कर्मचाऱ्यांच्या अनुभव आधारित माहिती स्वातंत्र्य श्रोतावर अवलंबून आहे. लेखातील कोणती माहिती अधिकृतीची निवेदनाशी जुळत नसतील तरी ते कंपनीचे अधिकृत घोषणेशिवाय निश्चित मानले जाऊ नये. वाचकांनी कोणताही वैयक्तिक निर्णय घेण्यापूर्वी स्वतःची खात्री करून घ्यावी.
