WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फक्त 7 तासांत नांदेड–पुणे प्रवास! वंदे भारतची मोठी घोषणा तिकीट किती? स्टॉप कोणते?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

High Speed Train Maharashtra 2025 |  राज्यातील रेल्वे प्रशासन साठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन महत्त्वाच्या भागांना जोडणारा प्रवास आता अधिक जलद वेगाने आणि आरामदायी होणार आहे. नांदेड पुणे दरम्यानची नवीन वंदे भारत एक्सप्रेस सेवेसाठी केंद्र सरकारकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 

रेल्वेत तब्बल 8,875 पदांची बंपर भरती! पदवीधर आणि बारावी पास उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी

सध्या नांदेड ते पुणे सुमारे 550 किलोमीटर अंतराचा प्रवास बस किंवा इतर कोणत्याही गाडीने करत असाल तर त्यासाठी तुम्हाला 10 ते 12 तासांचा वेळ लागतो.  परंतु वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यावर हा वेळ फक्त सात तासांवर येणार आहे त्यामुळे रोज शिक्षण नोकरी आणि व्यवसायासाठी पुण्यात येजा करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

High Speed Train Maharashtra 2025
High Speed Train Maharashtra 2025

नांदेड पुणे मार्गावर धावणारी ही दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरणार आहे. विशेष म्हणजे ही ट्रेन डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 पर्यंत प्रशासाठी सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

या मार्गावर ट्रेनची स्टॉप पुढीलप्रमाणे असणार आहेत 

  • नांदेड — लातूर —धाराशिव—कुर्डूवाडी —दौंड—पुणे 

दरम्यान, आठवड्यातून पाच ते सहा दिवस ही सेवा उपलब्ध राहणार असल्याची शक्यता आहे. अशी माहिती समोर येत आहे की तिकीट दराबाबती प्राथमिक अंदाज देण्यात आला असून AC चेअर  कारचे तिकीट सुमारे 1500 ते 1900 दरम्यान असणार आहे. 

मर्यादित रेल्वे सेवेमुळे आजवर प्रवाशांना ज्यादा वेळ आणि खर्च करावा लागत होता. मात्र वंदे भारती एक्सप्रेस सुरू झाल्यावर केवळ प्रवाशांचा कालावधी कमी होणार नाही तर आर्थिक सामाजिक संबंधी अधिक मजबूत होणार आहेत. 

High Speed Train Maharashtra 2025
High Speed Train Maharashtra 2025

तज्ञांच्या मते या प्रकल्पामुळे रोजगार, व्यापार, पर्यटन, या तिन्ही क्षेत्रात मोठी चालना मिळणार आहे. शिक्षण व नोकरीसाठी पुण्यात जाणाऱ्या तरुणांसाठी ही ट्रेन म्हणजे वरदान ठरणार आहे, अधिकृत उद्घाटनाची तारीख वेळापत्रक आणि तिकीट बुकिंग ची प्रक्रिया लवकर रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे.

रेल्वेत तब्बल 8,875 पदांची बंपर भरती! पदवीधर आणि बारावी पास उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी

Leave a Comment

error: Content is protected !!