GST on cars in India | सरकारने ग्राहकांसाठी सध्या एक आनंदाची बातमी दिली आहे, जीएसटी स्लॅब मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला चांगला दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य गाडी खरेदी करणाऱ्या नागरिकांना देखील याचा फायदा होणार आहे, आतापर्यंत पाच वेगवेगळ्या मध्ये वाहनावर कर आकारला जात होता परंतु आता तो फक्त दोन स्लॅब मध्ये बसवण्यात आला आहे. यामुळे आता छोट्या गाड्या दोन चाकी इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहन खरेदी करणे आता स्वस्त होणार आहे तर यानंतर दुसरीकडे लक्झरी कार आणि जास्त क्षमतेचे इंजन गाड्या मात्र महाग होणार आहे.GST on cars in India

कार आणि मोटरसायकल खरेदीवर मिळणार मोठी सूट ?
सरकारने पष्ट सांगितले की , 1200 सीसी पर्यंत पेट्रोल इंजन आणि 1500 सीसी पर्यंत डिझेल इंजन असलेल्या व चार मीटर पेक्षा कमी लांबीच्या कारवर आता 28% ऐवजी फक्त 18% जीएसटी आकारण्यात येणार आहे. म्हणजेच आता मारुती, हुंडाई, टाटा , होंडा यासारख्या कंपन्यांच्या छोट्याकार थेट ग्राहकांना स्वस्त मिळणार आहेत.

यानंतर दुसरीकडे 350 सीसी पर्यंतच्या दुचाकी वर ही आता 18% जीएसटी आकारण्यात येणार आहे. याआधी या सर्व कार वर 28% जीएसटी होती म्हणजेच ग्रामीण भागातील तरुणांनी घ्यायच्या बाईक आणि शहरातल्या विद्यार्थ्यांचा दुचाकी खरेदीसाठी लागणारा अतिरिक्त कर आता कमी होणार आहे. तीन चाकी रिक्षा देखील 28% वरून 18% च्या घरात आल्याने प्रवासी रिक्षा मालकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
इलेक्ट्रिक आणि हायब्रीड गाड्यांवर देखील जीएसटी कमी !
सर्व देशांमध्ये पेट्रोल डिझेल महाग होत असताना आता इलेक्ट्रिक वाहन हाच एक पर्याय उरला आहे. सरकारनेही पर्यावरणाचा विचार करून इलेक्ट्रिक वाहनांवर आकारण्यात येणारा कर हा मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. आतापर्यंत इलेक्ट्रिक गाड्यांवर 12% जीएसटी आकारण्यात येत होती पण आता या सर्व गाड्यांवर फक्त पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.
यामुळे आता टाटा नेक्सॉन ईव्ही, महिंद्रा ईव्ही, हुंडाई कोना , अशा या सर्व गाड्या आणि दोन चाकी इव्ही गाड्या खूप स्वस्त होणार आहेत. हायड्रोजन फुल सेल गाड्या व हायब्रीड गाड्या सुद्धा आता 28 ऐवजी 18% जीएसटी लागणार आहे. म्हणजेच आता ग्राहकांना इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक गाडी खरेदी करता वेळेस मोठा फायदा होणार आहे.
गाड्यांच्या किमतीमध्ये किती फरक पडणार ?
लहान कारची बेसिक प्राईस ही पाच लाख असेल तर याआधी १८ टक्के जीएसटी म्हणजेच 1 लाख 24 हजार रुपये जास्त द्यावे लागत होते. म्हणजेच आता फक्त १८ टक्के जीएसटी द्यावे लागणार आहे १८ टक्के म्हटल्यावर फक्त 90 हजार जीएसटी इतकी द्यावी लागणार आहे ग्राहकांना आता थेट 50 हजार रुपयांचा फायदा होणार आहे.

10 लाख रुपये किमतीत असलेल्या पेट्रोल कारवर याआधी दोन लाख 80 हजार रुपये जीएसटी द्यावी लागत होती आता ती 18% केल्यामुळे फक्त ग्राहकांना एक लाख 80 हजार रुपये इतकी द्यावी लागणार आहे. म्हणजेच यामध्ये ग्राहकांना थेट 1 लाख रुपयांचा फायदा होणार आहे.
ग्राहकांना मोठा फायदा !
सामान्य कुटुंबातील नागरिकांना एक गाडी घेणे म्हणजे स्वप्न सारखा असतं घरच्या मंडळींना बरोबर घेऊन एका छोट्याशा कार मध्ये फिरायला जाणं त्याचबरोबर मुलांना शाळा कॉलेजला सोडणं सोपं होण्यासाठी कार घेण्याची इच्छा बऱ्याच सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना असते. आता सरकारच्या या निर्णयामुळे लहान कार आणि दुचाकी खरेदी करणाऱ्या लाखो ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.
Disclaimer :
या लेखांमध्ये दिलेली माहिती ही विविध वृत्तपत्रे आणि सरकारी घोषणांवर आधारित आहे. वाहनांच्या जीएसटी दरामध्ये व किमतीमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो, नागरिकानी कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी वाचकांनी अधिकृत सरकारी अधिसूचना व संबंधित वाहन कंपनीची ताजी माहिती तपासून घ्यावी.