Gold Rate Today | नमस्कार मित्रांनो तुम्ही सोने खरेदीच्या तयारीत आहात का? कारण आज महिन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी सोन्याच्या आणि चांदीच्या भावात पुन्हा घसरण पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी रेकॉर्ड ब्रेक सोन्याच्या किमतीत आता सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण पाहिला मिळत आहे.
हे पण वाचा| Gold Update : घरामध्ये किती सोने ठेवता येते? नियम जाणून घ्या, नाहीतर आयकर विभाग पाठवेल नोटीस!
राजधानी दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 23 हजार 140 वर आला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 12 हजार 890 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. म्हणजेच गेल्या आठवड्याच्या तुलनेने 24 कॅरेट सोनं 2620 रुपये आणि 22 कॅरेट सोनं हे 2400 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, पुणे आणि बेंगलोर या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 22 हजार 90 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 12 हजार 740 प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. म्हणजेच आता देशभरात सोन्याचे दरामध्ये घसरण झाली आहे , देशभरातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दारात थोडाफार फरक दिसून येतो परंतु दिल्लीमध्ये दर थोडा जास्त दिसतो आहे.
चांदीच्या दरात घसरण !
सोन्या प्रमाणात चांदीचे भावातील घसरण झाली आहे. आज सकाळी चांदीचा भाव 1 लाख 51 हजार 900 रुपये प्रति किलो इतका होता. एका आठवड्यात चांदीचे दारात तब्बल 3000 रूपांची झाली आहे. ही घसरण सलग तिसऱ्या आठवड्यापासून सुरू आहे आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे स्पोर्ट किंमत सध्या $48.97 प्रति औंस आहे.

आर्थिक तज्ञाच्या मते , आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता डॉलरचा दर आणि गुंतवणुकीचा कल या घटनेमुळे सोन्या चांदीच्या किमतीमध्ये चल उतार कायम होत आहे. लग्नाच्या हंगामाच्या तोंडावर सोन्याच्या या घसरणीने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे पण बाजारातील ही गट कायम राहील का ती पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होणार हे पुढील काय दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.
