Gold Price Drop | सोनू खरेदी करण्याचा विचार सुरू आहे का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी , कारण आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एक नोव्हेंबरला सोन्याच्या किमतीत पुन्हा एक मोठा उलटफेर पाहिला मिळाला आहे. काल थोडा वाढलेला भाव आज पुन्हा खाली आला असून सर्वसामान्य ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे, नोव्हेंबर पासून लग्नाचा मौसम सुरू होत असल्याने अनेक जण दागिने बनवण्यासाठी सोने खरेदी करतात त्यामुळे भाव कमी व्हावेत अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती आणि ती आज खरी ठरली आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या तारा तब्बल 280 रुपयांची घसरण झाली असून सध्या प्रती तोळा 1 लाख 23 हजार रुपये या दराने विक्री होत आहे. आठ ग्रॅम सोनं 98 हजार चारशे रुपये तर दहातोळी सोन 13 लाख 30 हजार रुपयांना मिळत आहे. म्हणजेच कालच्या तुलनेत दहा तोळ्यावर जवळपास 2800 रुपयांचा फरक झाला आहे.
22 कॅरेट सोन्याचे दर ही आज खाली आले आहेत. प्रति तोळा 1,12,750 म्हणजेच 250 रुपयांची घसरण. आठ ग्रॅम सोन्याचे दर 90,200 रुपये झाले असून दहा तोळ्यावर तब्बल 2,500 रुपयांनी तर कमी झाले आहेत.
18 कॅरेट सोन्याचंही असंच चित्र पाहायला मिळत आहे. प्रति तोळा सोन आता 92,250 रुपयांना मिळते आठ ग्रॅम सोनं 73 हजार 800 रुपयांना मिळत आहे आणि दहा तळ्यावर जवळपास 2 हजार 100 रुपयांची घसरण झाली आहे.

दिवाळीनंतर सोन्याचे दर सतत खाली येत आहेत, काही दिवसांमध्येच सोन प्रति तोळ्या मागे जवळपास 7600 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे लग्नाची खरेदी करणाऱ्या घरांसाठी ही एक मोठी संधी आहे, बाबा व्यंगच्या भविष्यवाणी नुसार पुढच्या वर्षी सोन्याचे दर नव्या रेकॉर्डला भिडू शकतात .
आज सोन्याचा भाव खाली आलाय पण उद्या पुन्हा किती वाढेल हे सांगता येत नाही. त्यामुळे जर लग्न सण आणि गुंतवणुकीसाठी सोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वोत्तम राहणार आहे.
