Edible oil prices | सध्या महागाई झपाट्याने वाढत आहे आणि त्यातच घर खर्च देखील. सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ही बातमी नक्कीच दिलासादायक ठरणार आहे. कारण आपण दररोज जेवणात वापरणारे खाद्यतेल त्याचे दर सध्या थोडेसे घसरले आहेत, आणि त्यामुळे ग्रहणींना सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून तेलाच्या किमती स्थिर नसून, वर खाली होत होत्या. मात्र आता बाजारातून 15 लिटर तेलाचे डब्याचे दर कमी झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावरती थोडासा आर्थिक दिलासा मिळायला आहे.

खाद्यतेलाचे सध्याचे बाजार भाव काय?
सध्या बाजारात सोयाबीन तेल अंदाजे 130 रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. शेंगदाणा तेलाचा दर 185 च्या आसपास असून, सूर्यफूल तेल देखील सुमारे 130 लिटर दराने विकले जात आहे. मोहरी, खोबरेल आणि ऑलिव्ह तेलाचे दर काय स्थिर आहेत, पण काही ब्रँड नुसार थोडेफार चढउतार दिसून येतात. 15 लिटर तेलाच्या डब्याचा दरात सरासरी १०० ते २०० रुपयांची घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्यांना याचा अधिक फायदा होतो.
शेंगदाणा तेल चवदार आणि हृदयासाठी चांगले
शेंगदाणा तेल वेगळेपणा म्हणजे त्याची चव आणि हे तेल थोडेसे गोडसर आणि दाटसर असते, त्यामुळे तळणीसाठी हे खूप चांगले मानले जाते. यामध्ये मोनोअँनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे हृदयासाठी फायदेशीर मानले जाते कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी शेंगदाणा तेल उपयोगी ठरते. महाराष्ट्रामध्ये स्वयंपाकात अनेक घरांमध्ये आजही शेंगदाणा तेलाचे स्थान टिकून आहे.

तेल किती प्रमाणात वापरावे ?
कोणतेही तेल आरोग्यासाठी चांगले असू शकते, पण ते किती प्रमाणात वापरावे यावरती सगळं अवलंबून आहे. अधिक तेलाचे सेवन केल्यास वजन वाढ, हृदयविकाराचा धोका आणि पचन च्या तक्रारी होऊ शकतात. म्हणूनच आहारात तेलाचा समावेश हा समतोल असणे आवश्यक आहे. घरात जशी विविध भाज्या वापरल्या जातात तसेच विविध प्रकारचे तेल वापरले तर आरोग्यासाठी ते चांगले ठरते.
(Disclaimer | वरील दिलेली माहिती ही प्रसार माध्यमांच्या आधारे आहे आम्ही कुठलाही दावा करत नाही या वरती विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित माध्यमांच्या लेखांचा आढावा घ्यावा.)
