Android phone New update | नमस्कार मित्रांनो आज प्रत्येक माणूस हा स्मार्टफोन वापरत आहे , परंतु या स्मार्टफोनमध्ये अनेक अपडेट होत असतात अनेक नवीन फीचर्स ऍड होत असतात जर तुम्ही देखील स्मार्टफोन वापरत असाल तर एक दोन तीन दिवसांपूर्वी तुमच्या फोनमध्ये देखील तुम्हाला बदल पाहायला मिळाला असेल. जवळपास सर्वच अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या कॉल आणि डायलर सेटिंग अचानक अपडेट किंवा नवीन बदल झाला आहे यामुळे अनेक स्मार्टफोन वापर करता चकित झाले. Android phone New update
सध्या सर्व सोशल मीडियावरती एकच फ्रेंड सुरू आहे तो म्हणजे फोन मध्ये अचानक झालेली बदल. अनेकजण याच्यावर नाराजी देखील व्यक्त करीत आहेत कारण की ते म्हणत आहे की आम्ही तर काही चेंज केला नाही परंतु आमची फोन सेटिंग कस काय चेंज झाली आहे. यामुळे अनेकजण गोंधळात पडले आहे आपला फोन हॅक तर नाही ना झाला असे प्रश्न अनेक नागरिकांना पडत आहेत.
अनेक नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या नवीन झालेल्या अपडेट ची माहिती शेअर केली आहे. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती जगभरातील अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनमध्ये झालेले या नवीन बदलाबाबत सोशल मीडियावरती माहिती दिली आहे. हे बदल फक्त अँड्रॉइड फोन मध्ये झाले आहेत आयफोन फोन मध्ये अशाप्रकारे कसलाही बदल झालेला नाही त्यामुळे आयफोन वापर करताना काळजी करण्याची गरज नाही.
नेमकं हा नवीन अपडेट कशासाठी ?
एका सोशल मीडिया वापरकर्त्याने त्याच्या अकाउंट वरून एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की अभिनंदन तुमच्या फोनच्या सेटिंग देखील बदलले आहेत एका सॉफ्टवेअर देखील आपोआप इंस्टॉल झाले आहे जे आता तुमचे विरुद्ध पोपटासारखे बोलेल. तर आणखीन एक वापरकर्त्यांनी असा प्रश्न निर्माण केला आहे की तुमच्या हातात असलेल्या मोबाईल फोनची सेटिंग अचानक बदलले आहेत तुम्हाला खरे वाटतं की तुम्ही सुरक्षित आहात का नाही ? असे अनेक प्रश्न निर्माण झालेले दिसून आले आहे.
परंतु हा प्रकार काय ?
सर्व स्मार्टफोन सॉफ्टवेअर हे गुगल कडून तयार केले जातात आणि त्यांच्याकडून अपडेट देखील केले जातात. या कंपनीने मे 2025 मध्ये घोषणा केली होती की ती मटेरियल 3d एक्सप्रोसिव्ह या नावाने नवीन अपडेट देणार आहे, हे अपडेट मागील अनेक वर्षांमध्ये झालेल्या अपडेट नुसार सर्वात मोठे अपडेट असणार आहे.
या अपडेट द्वारे फोन मधील सॉफ्टवेअर आणि डिस्प्ले चा वापर अधिक सोपा आणि जलद अधिक माहिती पूर्व होईल अशी माहिती गुगलकडून देण्यात आलेली आहे. गुगलकडून सांगण्यात आले की या नवीन अपडेट मुळे डिस्प्ले सेटिंग मध्ये अनेक गोष्टी बदलणार आहे जसे की नोटिफिकेशन कलर थीम फोटोज जीमेल आणि वॉच इत्यादी यातील अपडेट देखील या नवीन अपडेटचा भाग असणार आहे.
गुगलच्या नवीन अपडेट यामुळे कॉलिंग ॲप हे अधिक सोपे होणार आहे, गुगलने आता कॉलिंग ॲप मध्ये रिसेंट आणि फेवरेट हे पर्याय काढून टाकले आहे या पर्यायांना आता होम मध्ये मर्ज केले आहे त्यामुळे आता तुम्ही फोन ऍप उघडल्यानंतर तुम्हाला फक्त होम आणि कीपॅड असा इंटरफेस दिसत आहे. या नवीन अपडेट मध्ये आता एकच नंबर वरून आलेले सर्व कॉल तुम्हाला एकत्रित एकाच ठिकाणी दिसणार आहेत तर कॉल हिस्टरी मध्ये वेळेनुसार दाखवली जातील व तुम्हाला यावर कॉन्टॅक्ट शोधायची गरज पडणार नाही.
या नवीन अपडेट मुळे आता तुमच्या फोनमधील येणारे जाणारे कॉल अगदी स्पष्टपणे तुम्हाला लक्षात येणार आहेत, तसेच प्रत्येक नंबर वेगळा उघडून किती मिस कॉल आहेत किंवा किती रिसीव आहेत हे पाण्याची गरज राहणार नाही असं गुगलचं म्हणणं आहे. तुमच्या फोनमधील कॉल सेटिंग डिझाईन बदलण्यात आलेली आहे नवीन डिझाईन नुसार इनकमिंग कॉल ची रचना देखील बदलण्यात आली आहे जेणेकरून वापरकर्त्याकडून खिशातून फोन काढताना चुकून कॉल रिसीव किंवा कट होणार नाही.
हे पण वाचा | मोदी सरकारची मोठी घोषणा! देशभरातील नागरिकांना दिवाळीनिमित्त मिळणार मोठे गिफ्ट वाचा माहिती
