PM Kisan 21st Installment Date | केंद्र सरकारची पीएम किसान सन्मानित योजना शेतकऱ्यांसाठी जीवनदायी योजना आहे. या योजनेत प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 20 हप्ते यांच्या खात्यावरती जमा झाले आहे, आता शेतकऱ्यांची नजरा 21 व्या आपल्याकडे लागलेले आहेत. PM Kisan 21st Installment Date
हे पण वाचा| Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2,000 रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार?
या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21 वा हप्ता जमा !

मागील 20 वा हप्ता हा दोन ऑगस्ट रोजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. पण यावेळी थोडा उशीर झालेला दिसत आहे काही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 21 वा हप्ता आधीच जमा झाला आहे. ज्यामध्ये पंजाब, जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या हप्त्याचा लाभ जमा करण्यात आला आहे. पण महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अजून पैशाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत.
हे पण वाचा| Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2,000 रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार?
सूत्रांच्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र ज्यांनी पडताळणी प्रक्रिया म्हणजेच KYC पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या शेतकऱ्यांचा हप्ता हा लांबीवर जाऊ शकतो त्यामुळे अजून जर तुम्ही तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर ती लवकरात लवकर करून घ्यावी.

पी एम किसान योजनेचा लाभ फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळत आहे ज्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीकडे 2 हेक्टर जमीन आहे तसेच राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश क्या लाभार्थी यादीत नाव असणे आवश्यक आहे. केवायसी पूर्ण झाल्यानंतर हफ्ता थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो.
याप्रकारे करा तुमच्या हप्त्याची स्थिती चेक !
जर तुम्हाला तुमच्या हप्त्याची स्थिती चेक करायची असेल तर तुम्ही सर्वप्रथम पी एम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते प्राप्त झाले हे तुम्ही चेक करू शकता.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हा हप्ता केवळ आर्थिक मदत नसून दिवाळीचा गिफ्ट ठरणार आहे. सणासुदीच्या काळात थोडीशी का होईना पण ही मदत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणते. सरकार वेळोवेळी मदत करेल का ? हप्ता सुरळीत खात्यामध्ये जमा होणार का ? अशी अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येत आहे .
अशाच नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

1 thought on “पीएम किसान २१वा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिवाळीपूर्वी खात्यात पैसे येणार का? ”