Ladki Bahin Yojana Kyc | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत सध्या मोठी धावपळ सुरू झाली आहे. E kyc प्रक्रियेमुळे अनेक लाभार्थी महिला रात्रभर जागून आपली केवायसी करण्याच्या मागे लागली आहे. अनेकांनी पोर्टलवर प्रयत्न करूनही OTP येत नाही त्यामुळे e kyc पूर्ण होत नाही. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या तांत्रिक अडचणीवर काम सुरू असल्याच सांगितले असून लवकरच समस्या दूर होणार आहे असे देखील ते म्हटले आहे.
हे पण वाचा| लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी ! eKYC OTP येत नाही मग लवकर करा हे काम
महाराष्ट्र सरकारने मागच्या वर्षी राज्यातील गरिबांनी आणि गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. परंतु ज्यावेळी ही योजना सुरू केली होती त्यावेळी कुठल्याही प्रकारची पडताळणी केली नाही त्यामुळे अनेक अपात्र महिलांनी या योजनेला अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला आहे, यामुळे सरकारचे मोठे नुकसान झाले असून सरकारने आता या योजनेमध्ये e kyc प्रक्रिया लागू केली आहे.

सरकारने e kyc करण्यासाठी मात्र महिलांना दोन महिन्याची मुदत दिली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते मिळणार नाहीत अशी भीती देखील निर्माण झाली आहे, तरी सरकारने पष्ट केले आहे की सध्या पैसे थांबवण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही म्हणजेच हप्ता थांबायचा असेल तर तो नोव्हेंबर पासून थांबवला जाऊ शकतो.
गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात सरकारने दोन हप्त एकत्रित दिले होते. त्यामुळे महिलांना 4500 रुपये मिळाले आणि त्यांची दिवाळी गोड झाली. यंदाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्याने सरकार लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्या येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन e kyc प्रक्रियेसाठी मुदतवाढ मिळू शकते.
हे पण वाचा| लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी ! eKYC OTP येत नाही मग लवकर करा हे काम
E kyc करण्याची सोपी प्रक्रिया :

- सर्वप्रथम तुम्हाला https://ladkibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे.
- यानंतर लॉगिन करून e kyc प्रक्रिया पूर्ण करा हा पर्याय दिसेल.
- तुमचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाका
- यानंतर तुमच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरती OTP आल्यानंतर तो टाका.
- त्यानंतर पती किंवा वडील आता आधार क्रमांक, कॅपचा आणि ओटीपी भरा.
- जात प्रवर्ग निवडा आणि आवश्यक कागदपत्राची पुष्टी करा .
- पडताळणी यशस्वी झाल्यानंतर स्क्रीनवर दिसेल की तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
काय म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे ?

मुख्यमंत्री माजी लाडकी भाई योजनेचे e kyc करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. महिला व बालविकास विभागाने याबाबतची दखल घेतली असून तज्ञांच्या माध्यमातून उपाय योजना सुरू केले आहे. लवकरच ही अडचण दूर होऊन e kyc वेबसाईट सुरळीत सुरू होणार आहे याची मी सर्व लाडक्या बहिणींना खात्री देते.

2 thoughts on “E kyc केली नाही तर मिळणार नाही दिवाळीचा हप्ता ! आता या प्रकारे करा लाडकी बहीण योजनेची kyc ”