Railway Bharti 2025 : नोकरीच्या शोधात असलेल्या लाखो तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, रेल्वे भरती बोर्डाने 2025 साठी मोठी भरती जाहीर केली आहे. ग्रामीण भागात , शहरात गावापासून लांब राहून अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी रेल्वेने दिली आहे. आज-काल खाजगी नोकऱ्या असल्या तरी त्यात पगार कमी आहे सुरक्षिता कमी आहे आणि भविष्याचा आधार नाही. म्हणूनच सरकारी नोकरीकडे सर्वांचे लक्ष असतं अशावेळी एवढ्या हजारो पदांसाठी जाहिरात आल्यामुळे रोजगाराच्या आशा पुन्हा जागे झाले आहेत.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने एनटीपीसी 2025 अंतर्गत 8875 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये 5817 पदे पदवीधरासाठी आणि 3 हजार 58 पदे बारावी पास तरुणांसाठी राखीव आहे. म्हणजेच आता शिकवते वाया जाणार नाही पदवी असणाऱ्या पासून ते बारावी पास तरुणांपर्यंत ही संधी सर्वांना मिळणार आहे.
यामध्ये सर्वात जास्त भरती ही मालगाडी प्रबंधक या पदाकरिता आहे. यामध्ये तब्बल 3423 जागा या पदासाठी राखीव आहेत, त्यानंतर ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट या पदाकरिता 921 जागा तर स्टेशन मास्टर या प्रतिष्ठेच्या पदासाठी 615 जागा उपलब्ध आहेत. या सर्व पदांसाठी वेगवेगळे शैक्षणिक दर्जे लागू असून वेतनश्रेणी वेगळी आहे पण एकंदरीत सरकारी नोकरी आणि रेल्वे सारख्या मोठ्या विभागात असल्यामुळे उमेदवारांमध्ये याबद्दल चांगला उत्साह दिसून येत आहे.

बारावी पास म्हणजेच नॉन ग्रॅज्युएट गटामध्ये देखील चांगली संख्या आहे, कमर्शियल कम तिकीट क्लार्क या पदासाठी तब्बल 2424 जागा भरण्यात येणार आहेत. अकाउंटन्स कम टायपिस्ट या पदाकरिता 394 जागा ज्युनियर क्लार्क कम टायपिस्ट या पदाकरिता 163 जागा आणि ट्रेन क्लार्क पदासाठी 77 जागा उपलब्ध आहेत. अनेकांना वाटतं की फक्त पदवीधरांना सारखे नोकरी मिळते पण रेल्वेने सामान्य विद्यार्थ्यांनाही आता संधी दिली आहे, ज्याचं पुढचं शिक्षण थांबले आहे किंवा घरची जबाबदारी असल्याने पुढे शिकता आले नाही असे उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
अर्ज प्रक्रिया :
आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज प्रक्रिया, या भरतीसाठी तुम्हाला सर्वप्रथम www.rrbcdg.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला वर दिलेल्या टॅब वर क्लिक करून तुमचा अर्ज भरायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे, त्यानंतर वैयक्तिक माहिती शैक्षणिक पात्रता आणि पदाची निवड करून सर्व माहिती योग्य भरून घ्यायची आहे. अर्ज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शुल्क भरायचा आहे आणि फॉर्म सबमिट करून अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे.

अर्ज केल्यावर पुढील टप्पा म्हणजे निवड प्रक्रिया, उमेदवाराची निवड दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे सर्वप्रथम तुम्हाला संगणकआधारित परीक्षाद्वारे होणार आहे पहिली परीक्षा म्हणजे, CBT–1 ही स्क्रीनिंग टेस्ट असेल म्हणजेच सुरुवातीचं चाळण, यानंतर तुम्हाला CBT–2 ही विशिष्ट शाखेनुसार परीक्षा होणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि आवश्यकतेनुसार कौशल्य चाचणी घेतल्या जाईल रेल्वेच्या भरतीत पारदर्शकता असते आणि जवळपास सर्व प्रक्रिया तंत्रज्ञानाचा आधार असल्याने उमेदवारांची मेहनत महत्त्वाची ठरते.
आजचा काळ हा रोजगाराचा तुटवडा असलेला आहे, गावाकड शेतीवर अवलंबून असलेले कुटुंब शहरांमध्ये महागाईशी लढत जाणारे तरुण ,आई बापाने कर्ज काढून शिकवलेले मुले मुली, सगळ्यांचे नजर या भरती कडे वळले आहेत. पदवी घेतलेल्या मुलांना जबाबदारी उचलायला सुरुवात झाली आहे बारावी पास मुलांनाही घरासाठी काहीतरी करायचं , असा विचार येतो पण खाजगी नोकरी म्हणजे पोटभर पगार देत नाही अशावेळी रेल्वे सारख्या विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळणं म्हणजे जीवनाला दिशा देणे आहे.
