WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway Department Recruitment 2025 : रेल्वे मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway Recruitment 2025 | सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न आहे, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण आता तुम्ही बघितलेले स्वप्न पूर्ण होणार आहे. दक्षिण रेल्वे कडून क्रीडापटून करिता एक मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. स्पोर्ट कोट्या अंतर्गत तब्बल 67 पदासाठी ही भरती होणार असून, यासाठी कुठलीही लेखी परीक्षा नसून फक्त खेळातील उपलब्धी ती आणि मैदानावरील कामगिरीच्या आधारावरच निवड होणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. Railway Recruitment 2025

कोणत्या पदासाठी भरती?


दक्षिण रेल्वेने काढलेल्या या जाहिरातीनुसार एकूण 67 पदे उपलब्ध आहेत. त्यापैकी लेवल चार आणि पाच मध्ये पाच जागा, लेवल दोन आणि लेवल तीन मध्ये 16 जागा तर लेवल एक मध्ये सर्वाधिक 46 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये खेळातील प्रवीण्य महत्त्वाचे निकष असतील.

शैक्षणिक पात्रता काय?


लेवल एक साठी किमान 10वी उत्तीर्ण किंवा आयटीआय आवश्यक. लेवल दोन व त्यावरील पदासाठी बारावी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण असणे बंधनकारक.
याशिवाय वय मर्यादा एक जानेवारी 2026 रोजी किमान 18 वर्षे व कमाल पंचवीस वर्षे अशी निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे अर्जदाराची जन्मतारीख 2 जानेवारी 2001 ते 1 जानेवारी 2008 दरम्यान असावी.

निवड प्रक्रिया कशी असणार?


या पद भरतीमध्ये लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, प्रथम उमेदवारांच्या खेळातील कामगिरीची नोंद पहिली जाईल, त्यानंतर स्पोर्ट्स ट्रायल्स घेतल्या जातील. मैदानावर दाखवलेली खरी ताकद, महिन्यात आणि खेळातील कौशल्य यांच्या आधारेच अंतिम निवड केली जाईल. शेवटी कागदपत्र पडताळणी करून अंतिम यादी जाहीर होईल.

पगार किती मिळणार?


निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे. लेवल1 च बेसिक वेतन 18,000 रुपये प्रति महिन्यापासून सुरू होईल, तर उच्च स्तरावरील पदांसाठी ते 29,200 रुपये प्रति महिना पर्यंत जाऊ शकतं. त्यामुळे खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळण्यासोबतच प्रतिष्ठेची सरकारी नोकरी मिळणार आहे.

अर्ज कसा करणार ?


अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2025 आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून उमेदवारी दक्षिण रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन Sports Quota Requirement 2025 या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून शुल्क भरल्यावर फॉर्म सबमिट करायचा आहे.

अर्ज शुल्क किती?

सामान्य वर्गातील उमेदवारांना शुल्क पाचशे रुपये ठेवण्यात आल आहे. मात्र चाचणीनंतर त्यातील चारशे रुपये परत केले जातील. तर SC, ST, महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये असून ते पूर्णपणे परत केले जाणार आहे. म्हणजे या भरतीसाठी अर्ज करणे जवळपास मोफतच आहे.

सरकारी नोकरी करायचे आहे आणि खेळामध्ये करिअर करायचे आहे अशा तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे इथे अर्ज करून तुम्ही तुमचं सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!