Railway Recruitment 2025 | तरुणांसाठी एक मोठी संधी आली आहे, रेल्वे विभागात नोकरी करायचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो युवा तरुणांना आता मोठी खुशखबरी समोर आली आहे. 2025 मध्ये रेल्वेत एकूण 2865 रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे, यामध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला केवळ दहावी आणि बारावीच्या मिळाल्या गुणाचे आधारेनुसार मिरीट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि यानुसार तुमचे सिलेक्शन केले जाणार आहे. जर तुम्ही देखील दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर ही संधी चुकू नका नाहीतर तुम्हाला पश्चाताप होईल. Railway Recruitment 2025
कधी सुरू होणार अर्ज प्रक्रिया
या भरती करिता अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे, अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख 29 सप्टेंबर 2025 ची राहणार आहे. शेवटच्या क्षणाची वाट न पाहता वेळेवर अर्ज करावा असा सल्ला दिला आहे अनेकदा ग्रामीण भागातील उमेदवार इंटरनेट समस्या किंवा इतर समस्यांना सामोर जावे लागत आहे . त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचा अर्ज भरून घ्यावा
कोणत्या प्रवर्गासाठी किती पदे रिक्त ?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 2865 पदांकरिता ही भरती होणार आहे यामध्ये सर्वसाधारण मागासवर्गीय आणि आर्थिक गृह घटक अशा सर्वांसाठी जागा राखीव ठेवण्यात आले आहे.
- सर्वसाधारण वर्ग : ११५० पदे रिक्त
- अनुसूचित जाती : 433 पदे रिक्त
- अनुसूचित जमाती : 215 पदे
- इतर मागासवर्ग : 718 पदे
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : 289 पदे
- एकूण रिक्त पदे : 2865
अर्ज करण्यासाठी पात्रता काय ?
या पदाकरिता उमेदवार हा दहावी आणि बारावी परीक्षा किमान 50 गुणाचे उत्तीर्ण असला पाहिजे.
यानंतर NCVT किंवा SCVT बंडू प्राप्त संस्थेकडून आयटीआय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
या भरतीसाठी वयोमर्यादा काय ?
- पात्र उमेदवार किमान 15 वर्षी पूर्ण असला पाहिजे .
- पात्र उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 24 वर्षे इतके असले पाहिजे.
- SC \ ST उमेदवारांकरिता : 5 वर्षे सूट
- OBC उमेदवारासाठी : 3 वर्षाची
- दिव्यांग उमेदवार : 10 वर्षाची सूट
निवड प्रक्रिया कशी असणार ?
मिळालेले माहितीनुसार या भरतीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उमेदवाराला कुठलेही प्रकारची लेखी परीक्षा द्यायची गरज नाही दहावी आणि बारावीच्या गुणावर या भरतीसाठी मेरिट लावण्यात येणार आहे आणि उमेदवार थेट भरती होणार आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावा .
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- दहावी आणि बारावी प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास )
ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही एक मोठी संधी निघून आली आहे, जे तरुण सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांची मुलं शेतातून शिक्षण पूर्ण करून शहरात रोजगार शोधत असतात पण सध्या स्पर्धा खूप वाढली आहे , त्याचबरोबर शहरातील जास्त फी आणि अवघड अभ्यास यामुळे अनेकांचे स्वप्न अपूर्ण राहत आहेत. अशा सर्व तरुणांसाठी आता रेल्वे विभागांमध्ये कुठलीही परीक्षा न देता फक्त मिरीट वर नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

1 thought on “रेल्वे मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! कोणतीही परीक्षा नाही, फक्त मेरिट लिस्टवर होणार सिलेक्शन ”