WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra 10th Result Live | दहावी निकाल जाहीर! निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra 10th Result Live | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी (SSC) परीक्षेचा निकाल आज, 8 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. राज्यभरातील तब्बल 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची प्रतिक्षा अखेर संपणार असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहू शकणार आहेत. निकालापूर्वी सकाळी 11 वाजता राज्य मंडळाची अधिकृत पत्रकार परिषद होणार असून त्यामध्ये एकूण निकाल, विभागनिहाय टक्केवारी आणि गुणवत्ता यादीची माहिती दिली जाणार आहे. Maharashtra 10th Result Live

दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर

महाराष्ट्र बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येईल. विद्यार्थी आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकून निकाल पाहू शकतील. यंदाही निकाल डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हे पण वाचा : मोठी बातमी! दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने घेतला महत्त्वाचा निर्णय…

राज्यात पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, लातूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. 16 लाखांहून अधिक विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत यंदा राज्यभरातून एकूण 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी SSC परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यामध्ये: 8 लाख 64 हजार 480 मुलं, 7 लाख 47 हजार 136 मुली परीक्षेला बसले होते. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक निकालाच्या तारखेची वाट पाहत होते. अखेर आज त्यांची प्रतिक्षा संपणार आहे.

‘या’ अधिकृत वेबसाईटवर पाहा निकाल

विद्यार्थ्यांना खालील अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे:

Mahahsscboard Official Website

SSC Result MKCL

DigiLocker Result

Target Publications Results

Navneet Results

DigiLocker वर डिजिटल गुणपत्रिका उपलब्ध

यंदाही विद्यार्थ्यांना DigiLocker वर डिजिटल मार्कशीट डाउनलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. बोर्डाकडून सांगण्यात आले की, विद्यार्थी DigiLocker App मध्ये लॉगिन करून आपली डिजिटल गुणपत्रिका सुरक्षित ठेवू शकतात.

तसेच शाळांना त्यांच्या शाळेचा एकत्रित निकाल school login द्वारे उपलब्ध होणार आहे.

गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाची सुविधा

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ही प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः किंवा शाळेमार्फत करता येईल.

बोर्डाने यासंदर्भातील सर्व अटी आणि सूचना वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्या आहेत.

निकाल कसा पाहायचा?

SSC Result 2026 पाहण्याची सोपी पद्धत अधिकृत वेबसाईट उघडा SSC Result 2026 लिंकवर क्लिक करा, सीट नंबर आणि आईचे नाव टाका, Submit बटणावर क्लिक करा, स्क्रीनवर निकाल दिसेल, भविष्यासाठी प्रिंट किंवा PDF सेव्ह करा

विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता शिगेला

निकाल जाहीर होण्यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काही शाळांमध्ये निकालासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याने सांगितले गेल्या काही दिवसांपासून निकालाची खूप उत्सुकता होती. आता फक्त चांगल्या निकालाची अपेक्षा आहे.

पुढे काय?

दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना आता अकरावी प्रवेश प्रक्रियेची तयारी करावी लागणार आहे. विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांसाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून काही तासांतच त्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग निश्चित होणार आहे.

Leave a Comment