Namo Shetkari Yojana News Maharashtra | राज्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज समोर आलेले आहे जर तुम्ही देखील शासनाच्या नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी नक्की वाचा करा याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेले आहे. ती म्हणजे शेतकऱ्यांना लवकरच आता पुढील हप्ता म्हणजे नववा हप्ता खात्यावरती जमा होणार आहे चला तर जाणून घेऊया 9 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार?
नमो शेतकरी योजना काय?
सर्वात प्रथम शेतकरी बांधवांना आधी ही जाणून घ्या की नमो शेतकरी योजना काय आहे नमो शेतकरी योजना ही राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये राबवण्यात आलेली आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि आर्थिक फायद्याची ठरत आहे. ही योजना खरंतर केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत राबविण्यात येते आणि जे शेतकरी pm किसान योजनेचे लाभार्थ्या आहेत त्या शेतकऱ्यांना या योजनेचा हक्क मिळतो. बर तुम्ही विचारत असाल नेमकं हा लाभ कसा होतो.
हे पण वाचा : नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का? चेक करा लगेच
तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने 2019 मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी एक महत्त्वाची योजना राबवली ती म्हणजे पी एम किसान महा सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत पात्र असणारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मानधन दिले जाते. हे मानधन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हत्याप्रमाणे चार महिन्यांच्या अंतरावरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाते.
या योजनेची प्रेरणा घेऊन महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी एक महत्त्वाची योजना राबवली आहे ती म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत देखील महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना 6000 रुपयांचा आर्थिक मानधन देते. शेतकऱ्यांना कुठलेही अर्ज करण्याची प्रक्रिया नाही. जे शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना या योजनेचा दिला जातो.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार?
तर पीएम किसान योजनेचा हप्ता हा 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर लगेच राज्य सरकारने देखील आठवा हप्ता जमा केलेला आहे त्यानंतर आता केंद्र सरकारचा हप्ता ज्यावेळेस जमा होईल त्यावेळेस नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील अशी शक्यता आहे. तर पी एम किसान योजनेचा हप्ताह जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता काही प्रसारमाध्यम व सोशल मीडियावरती वर्तवण्यात येत आहे. तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता महाराष्ट्र सरकार जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करू शकते अशी शक्यता आहे परंतु अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही शासनाने देखील असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी बातमी वरती विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित निर्णयाकडे लक्ष ठेवावे.
ही बातमी बनवण्याचे कारण म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये अनेक वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जातात शेतकऱ्यांच्या खात्यावरती या दिवशी दोन हजार रुपये जमा होणार. तरी बांधवांनो अशा कुठल्याही अफवेला बळी न पडता शासनाच्या अधिकृत निर्णयाकडे लक्ष ठेवावे.
( Disclaimer : वरील दिलेली बातमी ही प्रसार माध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठल्याही दवा करत नाही.)
हे पण वाचा : नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जाहीर! शेतकऱ्यांनो तुमच्या खात्यात आले का पहा?
