Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांसाठी आधार ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या एकच प्रश्न सगळीकडे चर्चेत आहे, तो म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये नेमके कधी खात्यावर येणार. अनेक महिलांना ऑक्टोबरचा किंवा नोव्हेंबरचा हप्ता मिळाला, तर काहींचे पैसे अजूनही अडकलेले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बँका, अंगणवाड्या आणि ग्रामपंचायतींमध्ये याबाबत चौकशी वाढली आहे.
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी काही लाभार्थी महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र जमा केले होते. मात्र त्यावेळी तांत्रिक अडचणी, आधार लिंकिंग किंवा अर्ज मंजुरी उशिरा झाल्यामुळे अनेक महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळू शकला नाही. अशा महिलांसाठी आता नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे ३ हजार रुपये एकत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. Ladki Bahin Yojana
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांचे अर्ज ऑक्टोबर–नोव्हेंबरमध्ये मंजूर झाले होते पण पैसे खात्यात जमा झाले नव्हते, त्यांची प्रलंबित रक्कम आता हळूहळू सोडवली जात आहे. डिसेंबर महिन्याचा नियमित हप्ता साधारणपणे १० ते १५ तारखेच्या दरम्यान जमा केला जातो, मात्र काही ठिकाणी पडताळणी सुरू असल्यामुळे थोडा विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे जुलै किंवा ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या आणि उशिरा मंजुरी मिळालेल्या महिलांना मागील महिन्यांची थकबाकी आणि चालू महिन्याचा हप्ता असा मोठा एकत्रित निधीही मिळू शकतो.
मात्र, पैसे खात्यावर येण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे लाभार्थी यादीत नाव असणे. योजनेच्या पात्र यादीत नाव ‘Approved’ दाखवत असेल तरच रक्कम जमा होते. यासाठी महिलांना नारीशक्ती दूत अॅपवर लॉग इन करून अर्जाची स्थिती तपासता येते. तिथे अर्ज मंजूर असल्याचे दिसत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. तसेच शासनाने ग्रामपंचायती आणि नगरपालिकांकडे गावनिहाय पात्र महिलांची यादी पाठवलेली असून, ती अंगणवाडी केंद्रातही उपलब्ध आहे.
काही महिलांना अर्ज मंजूर असूनही पैसे मिळत नाहीत, यामागे काही सामान्य पण महत्त्वाची कारणे आहेत. बँक खाते आधारशी लिंक नसेल, खाते बंद किंवा निष्क्रिय झाले असेल, संयुक्त खाते दिले असेल किंवा आधार आणि बँक पासबुकवरील नावात थोडीफार तफावत असेल तर डीबीटीद्वारे पैसे अडकतात. त्यामुळे अशा महिलांनी बँकेत जाऊन आधार मॅपिंग आणि केवायसी पूर्ण आहे का, हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे.
जर तुमचा अर्ज अजूनही प्रलंबित दाखवत असेल तर आधार कार्ड, सक्रिय बँक पासबुक, महाराष्ट्राचा अधिवास पुरावा, उत्पन्न मर्यादेचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी. कोणतीही अडचण असल्यास अंगणवाडी सेविका किंवा संबंधित कार्यालयात तक्रार नोंदवणे हा सर्वात सोपा मार्ग आहे.
लाडकी बहीण योजना ही गरजू आणि पात्र महिलांसाठी आहे. त्यामुळे अर्जात चुकीची माहिती दिली असेल तर पुढे अडचणी वाढू शकतात. ज्यांचे सर्व कागदपत्रे योग्य आहेत आणि अर्ज मंजूर आहे, त्यांच्या खात्यात नोव्हेंबर–डिसेंबरचे ३ हजार रुपये टप्प्याटप्प्याने जमा होतील, अशी माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे.
तुमच्या खात्यात पैसे आले की नाहीत, अर्जाचे स्टेटस काय आहे, हे वेळोवेळी तपासत राहा, कारण एकदा रक्कम जमा झाली की त्याचा मेसेज थेट मोबाईलवर येतो
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)


1 thought on “लाडक्या बहीणींनो, नोव्हेंबर–डिसेंबरचे ३ हजार रुपये या दिवशी खात्यावर जमा होणार? यादीत नाव आहे का, हे आधी वाचा”