Post Office Deposit Return | नमस्कार मित्रांनो आजच्या घडीला मोठ्या जखमीच्या गुंतवणुकीपेक्षा लोकांना सुरक्षित आणि निश्चित पर्याय हवा असतो. कारण पैसे कमवा सोपं नाही आणि तो गमवण्याचा धोका तर प्रत्येकाला नको असा वाटतो अशावेळी पोस्ट ऑफिस ची टाईम डिपॉझिट योजना म्हणजे सर्वसाधारण लोकांसाठी एक योग्य आणि सुरक्षित पर्याय आहे. सरकारी हमी स्थिर व्याज आणि कर सवलत त्यामुळे गुंतवणूक केली तर पैसेच वाढत्यात आणि मन देखील शांत राहतं.
या योजनेत नेमकं खास काय ?
पाच वर्षासाठी गुंतवणूक केल्यास सध्या 7.5% व्याज लागू आहे, उदाहरणार्थ जर तुम्ही 5 लाखाची ठेव केली तर पाच वर्षांनी तुमचा पैसा 7 लाख 24 हजार 974 पर्यंत होणार आहे. म्हणजेच फक्त व्याजातून जवळपास 2,24,974 रुपये फायदा होणार आहे. आकडे ऐकून अनेकांच्या डोळ्यात आनंदाची चमक येणे स्वाभाविक आहे.

पोस्ट ऑफिस ची ही योजना म्हणजे सरकारी हमी असलेली गुंतवणूक, त्यामुळे शेअर बाजारातील चढ-उतार म्युचल फंडाचा रिस्क किंवा मार्केट क्रॅश याचा काही परिणाम होत नाही. ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, शेतकरी किंवा कमी रिस्क पसंत करण्यासाठी ही योजना म्हणजे सोन्याहून सुहागा आहे .
या योजनेतील 5 वर्षाच्या ठेवीवर आयकर कायदा 80C अंतर्गत कर सवलत मिळते म्हणजेच गुंतवणूक आणि बचत दोन्ही फायदे एकाच ठिकाणी मिळतात.
खाते उघडणं झालं सोपं :
तुमच्याकडे फक्त ओळखपत्र, पत्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो इतका असला पाहिजे. फक्त 1000 भरून खाते उघडता येणार आहे वर गुंतवणुकीची मर्यादा नाही. सिंगल खाते, जॉईन खाते, अगदी 10 वर्षापेक्षा मोठ्या मुलाचं खातेही पालक उघडू शकतात.

आजकाल महागाई रोज वाढत आहे , तिथे पैसा सुरक्षित ठेवून वाढवण हीच खरी हुशारी आहे. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना म्हणजे सुरक्षित खात्रीशीर आणि सर्वांसाठी सहज उपलब्ध असलेल्या आर्थिक पर्याय आहे.
