Soybean Bazar Bhav 2025 | पावसाचा जोर ओसरल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला वेग आणला आहे. आणि त्यामुळे राज्यातील बाजारपेठेमध्ये सोयाबीनची आवक वाढू लागलेली आहे, कालपर्यंत पावसामुळे बाजारात आवक कमी होती व्यापारी हातावर करून बसलेले होते पण आता परिस्थिती बदललेली दिसत आहे. शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर आपला माल घेऊन बाजारात धाव घेत आहेत आवक वाढल्यामुळे दर थोड्या प्रमाणात स्थिरावले आहेत, पण उच्च प्रतीच्या पिवळ्या जातीच्या सोयाबीनला मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हे पण वाचा | Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात 19 जिल्ह्यात पावसाचे अलर्ट ! राज्यात शाळा कॉलेज बंद
आज राज्यातील प्रमुख बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर |

आज राज्यातील बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर 3,200 रुपये पासून 4340 रुपये प्रति कुंटल इतके आहेत. सरासरी दर साधारण 3800 रुपयांच्या आसपास आहेत, सर्वाधिक दर जालना येथे नोंदवला गेला आहे तब्बल 4,350 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. तर अकोला येथे चार हजार शंभर रुपये यवतमाळ येथे चार हजार वीस रुपये आणि लातूर येथे चार हजार पन्नास रुपये इतका उत्सादर शेतकऱ्यांना मिळाला आहे.
पिवळ्या जातीच्या सोयाबीनला सर्वात जास्त मागणी :
पिवळ्या जातीच्या सोयाबीनला आज सर्वाधिक पसंती मिळत आहे. लातूर, यवतमाळ ,अकोला, मलकापूर ,दर्यापूर ,बाभूळगाव , या ठिकाणी पिवळ्या जातीच्या सोयाबीनला सर्वाधिक दर मिळत आहे , आणि यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच चळवळ लागलेली आहे. यामुळे शेतकरी जास्त प्रमाणात पिवळ्या जातीचा माल विक्रीला आणताना दिसत आहे.

आवक वाढण्याचे कारण स्पष्ट आहे कारण की मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे काढणी थांबली होती. पण आता हवामान साफ झाला आहे त्यामुळे शेतकरी झपाट्याने शेतातून काढणी करत आहेत आणि त्यामुळे बाजार समितीमध्ये गडबड वाढले आहे.
हे पण वाचा | Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात 19 जिल्ह्यात पावसाचे अलर्ट ! राज्यात शाळा कॉलेज बंद
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील आकडेवारी पाहिली तर लातूरमध्ये तब्बल 14,172 क्विंटल पिवळ्या जातीची सोयाबीनची आवक झाली आहे आणि सरासरी दर हे 4,050 रुपये मिळाला आहे. जालना बाजार समितीमध्ये सर्वाधिक 31 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. आणि या बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर तीन 3,800 रुपये मिळाला आहे. अकोला येथे 4,072 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून या सोयाबीनला चार हजार शंभर रुपये इतका दर मिळाला आहे. यवतमाळ बाजार समितीमध्ये 936 क्विंटल मालाची आवक झाली आहे या मालाला सरासरी 3800 रुपये इतका दर मिळाला आहे.

शेतकरी म्हणतात की , सोयाबीनच्या जातीवरून भाव ठरत आहे . पिवळ्या जातीला जास्त मागणी आहे त्यामुळे त्याला दरही चांगला आहे, पण स्थानिक आणि मिश्र जातीच्या मालाला व्यापारी फारसा दर देत नाही. सध्याच्या जर स्थितीत व्यापाऱ्यांचा अंदाज आहे की येणाऱ्या काही दिवसात घरात किंचित सुधारणा होऊ शकते. मात्र मोठा फरक अपेक्षित नाही कारण आवक दिवसां दिवस वाढत आहे आणि व्यापाऱ्यांकडे खरेदीचा माल साठा होऊ लागलेला आहे.
हे पण वाचा | Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात 19 जिल्ह्यात पावसाचे अलर्ट ! राज्यात शाळा कॉलेज बंद
