WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी, सरकार आता या गोष्टींचा देखील विचार करणार तुम्ही आहात का पात्र यामध्ये चेक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shetkari Karjmafi Yojana: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अवकाळी पाऊस, गारपीट आणि सतत बदलणाऱ्या हवामानामुळे बळीराजाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. एका बाजूला उभं पीक हातातून जातंय, तर दुसऱ्या बाजूला कर्जाचा डोंगर वाढतोय. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. कारण आता राज्यातील कर्जमाफीबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, समितीचा महत्त्वाचा अहवाल लवकरच राज्य सरकारकडे सादर होणार आहे.त्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या नजरा या निर्णयाकडे लागल्या आहेत. Shetkari Karjmafi Yojana

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ अंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी देण्याचा निर्णय घेतला होता… या घोषणेमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती पण आता या योजनेची अंमलबजावणी कशी होणार, कोणाला फायदा मिळणार आणि कोण वंचित राहणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे

या संपूर्ण प्रक्रियेसाठी माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती सध्या राज्यभरातील विविध घटकांचा सखोल अभ्यास करत आहे सदस्यांकडून अभिप्राय गोळा केला जातोय. गावागावातून माहिती घेतली जातेय. आणि हे सगळं चित्र समोर ठेऊन अंतिम अहवाल तयार करण्याचं काम जोरात सुरू आहे येत्या काही दिवसांत बैठकीत अंतिम चर्चा होऊन हा अहवाल सरकारकडे सादर केला जाणार आहे पण यावेळी कर्जमाफी फक्त ‘थकीत कर्ज’ बघून दिली जाणार नाही, हे स्पष्ट झालं आहे यावेळी सरकार अधिक खोलात जाऊन निर्णय घेणार आहे.

शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे, त्या जमिनीवर काय पिक घेतलं जातं, उत्पादन किती होतं, शेतकऱ्याने आधी कोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे का, याची सगळी माहिती गोळा केली जात आहे… म्हणजेच यावेळी खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांपर्यंतच मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय.

हे पण वाचा: 2 लाख रुपये कर्जमाफी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना येथे नोंदणी करा, तरच मिळणार कर्जमाफी?

इतकंच नाही तर अतिवृष्टी, गारपीट यामुळे ज्यांचं नुकसान झालं आणि ज्यांना आधीच काही मदत मिळाली आहे, अशा शेतकऱ्यांचाही डेटा तपासला जात आहे. एकाच शेतकऱ्याला वारंवार लाभ मिळतोय का, यावरही लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे यावेळी कर्जमाफी अधिक पारदर्शक आणि योग्य पद्धतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही या प्रक्रियेत विशेष स्थान दिलं गेलं आहे साखर कारखान्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना एफआरपी (न्याय्य दर) वेळेवर मिळतोय का त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे, याचाही अभ्यास केला जात आहे. कारण काही शेतकरी कागदावर सक्षम दिसतात, पण प्रत्यक्षात त्यांची परिस्थिती खूप वेगळी असते. हे लक्षात घेऊन यावेळी निर्णय घेतला जाणार आहे.

आज गावाकडचं वास्तव बघितलं तर अनेक शेतकरी अशा अवस्थेत आहेत की कर्ज फेडायचं तर पैसे नाहीत आणि पैसे मिळवायचे तर पीकच नाही. कधी पाऊस जास्त तर कधी पूर्ण गायब कधी बाजारभाव पडतो तर कधी पीकच हातात येत नाही त्यामुळे कर्जमाफी ही केवळ योजना नसून अनेक कुटुंबांसाठी जगण्याचा आधार बनते.

म्हणूनच आता या अहवालाकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. जर योग्य निकषांवर आणि खरी गरज ओळखून कर्जमाफी दिली गेली, तर हजारो नव्हे लाखो शेतकऱ्यांना नव्याने उभं राहण्याची संधी मिळू शकते अन्यथा पुन्हा एकदा कागदावरच योजना राहण्याची भीतीही काही शेतकरी व्यक्त करत आहेत.

एकूणच काय तर राज्यात अवकाळी पावसाने आधीच शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे त्यात कर्जाचं ओझं वाढत चाललं आहे अशा वेळी ही कर्जमाफीची प्रक्रिया किती प्रभावी ठरते यावरच पुढील काळात बळीराजाचं भविष्य ठरणार आहे त्यामुळे आता सगळ्यांची नजर सरकारच्या अंतिम निर्णयाकडे लागली आहे आणि प्रत्येक शेतकरी मनोमन एकच अपेक्षा ठेवून आहे यावेळी तरी न्याय मिळावा पालक

हे पण वाचा : नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जाहीर! शेतकऱ्यांनो तुमच्या खात्यात आले का पहा?

Leave a Comment