SBI Manager Recruitment 2025 : प्रत्येक तरुणाचं स्वप्न हे सरकारी नोकरी मिळवणं असतं, घराची परिस्थिती सुधारावी आई-वडिलांना आधार मिळावा तीर भविष्य घडावर अशी अनेक स्वप्न करून पाहतात. आणि यातल्या यात बँकेमध्ये नोकरी म्हणजे हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न असतात त्याचबरोबर अनेकांच्या नजरेत प्रतिष्ठेची गोष्ट असते. अशावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने एक मोठी भरती जाहीर केली आहे, या सुवर्णसंधीचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये, क्रेडिट एनालिस्ट मॅनेजर या पदाकरिता ही भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये मिडल मॅनेजमेंट गेट स्केल तीन अंतर्गत होणार आहे एकूण 63 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे यामध्ये 58 रेगुलर पण असून सहा बॅकलॉग पद भरती होणार आहे.
यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीसाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा नाही. या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही शॉर्टलिस्ट आणि मुलाखत यावर आधारित राहणार आहे. याचा अर्थ म्हणजेच ज्यांना आवश्यक पात्रता आणि अनुभव आहे त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची आणि सुवर्णसंधी आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी जास्त वेळ वाया घालू नये अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 ऑक्टोबर 2025 आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी sbi.co.in/careers या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे.
अर्ज करण्यासाठी पात्रता
या पदाला अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खाली दिलेल्या कोणतेही एक पदवी आवश्यक आहे.
- MBA
- PGDBA/ PGDBM / MMS
- CA/ CFA / ICWA
याबरोबरच उमेदवाराकडे किमान तीन वर्षाचा संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
या पदाकरिता अर्जदार उमेदवाराचे वय 25 वर्षे ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
पगार आणि इतर सुविधा :
या पदाकरिता उमेदवाराला चांगल्या प्रकारे पगार देण्यात येणार आहे, निवड झाल्यावर उमेदवाराला 85 हजार 920 रुपये ते 1 लाख 5 हजार रुपये एवढा पगार देण्यात येणार आहे. याचबरोबर DA, HRA, PF यासारख्या सर्व सरकारी भत्ते मिळणार आहेत सुरुवातीला सहा महिन्याचा प्रोबेशन कालावधी असणार आहे त्यानंतर कायमस्वरूपी नियुक्ती केली जाणार आहे.
आज आपण पाहिलं तर गावाकडे अनेक तरुण शिकून झालेत पदवी घेतली पण यांना चांगली नोकरी मिळत नाही, पण चांगल्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. काहीजण खाजगी कंपन्यांमध्ये अल्प पगारावर काम करून कुटुंब चालवत आहे , अशा वेळी जर सरकारी बँकेत नोकरी करण्याची संधी मिळाली तर ही संधी गमू नका लवकरात लवकर अर्ज करा .
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत :
- सर्वप्रथम sbi.co.in/ careers या अधिकृत वेबसाईटवर जा
- यानंतर तुम्हाला या पदाकरिता अर्ज भरायचा आहे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे.
- अर्ज सबमिट करण्याआधी सगळी माहिती एकदा पुन्हा पहा.
- अर्ज सादर करून फी भरल्यानंतर प्रिंट काढून घ्या.
ही भरती परीक्षा न देता थेट शॉर्टलिस्ट आणि इंटरव्यू द्वारे होणार आहे, आता खऱ्या पात्र आणि अनुभवी उमेदवारांना प्रधान्य मिळणार आहे त्यामुळे तुमच्याकडे आवश्यक अनुभव आणि पात्रता असेल तर ही संधी सोडू नका.
आज बेरोजगारीच्या काळामध्ये अशी संधी वारंवार येत नाही सरकारी बँकेत प्रतिष्ठेची नोकरी आणि भरघोस पगार भविष्यासाठी सुरक्षा आणि कुटुंबाला दिलासा हे सगळं एका नोकरीत मिळणार आहे. त्यामुळे या भरतीकडे हलकं समजू नका अर्ज करण्याची मुदत संपण्याआधीच या भरतीला अर्ज करा.
