RBI New Rule Update | आजकालच्या डिजिटल युगात मोबाईल अतिशय आवश्यक बनला आहे. कॉल, व्हॉट्सॲप, बँकिंग, शिक्षण, कामधंदा सर्वकाही या छोट्या मोबाईल मध्ये आहे. पण आता समजा तुम्ही कर्ज घेतलं आणि वेळेवर फेडलं नाही तर थेट तुमचा मोबाईल फोन लॉक होणार. होय असं घडू शकतो कारण रिझर्व बँक ऑफ इंडिया ने अशाच एका नवीन नियमाचा विचार केला आहे. आपण या लेखांमध्ये याच नवीन नियमाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
काय आहे नवीन नियम?
आरबीआय कर्जदाराकडून कर्ज रिकव्हर करण्याची ताकद वाढवण्यासाठी मोठ्या पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. या नियमानुसार जर एखाद्याने घेतलेले कर्ज वेळेत फेडलं नाही तर त्याच्या फोनमध्ये कर्ज घेताना इन्स्टॉल केलेल्या ॲपद्वारे तो फोन लॉक करता येईल. म्हणजेच ग्राहकांनी कर्ज न फेडल्यास ग्राहकांचा फोन ग्राहकांना वापरता येणार नाही. कॉल करणे इंटरनेट वापरणे ऑनलाइन व्यवहार यापैकी कोणतेही कार्य तुम्हाला करता येणार नाही.
होम क्रेडिट फायनान्सच्या माहितीनुसार, भारतात एक तृतीयांश पेक्षा जास्त लोक मोबाईल, टीव्ही फ्रीज यासारख्या उपकरणाचा वापर करण्यासाठी याची खरेदी कर्ज घेऊन करत आहेत. त्यातच भारतात तब्बल 1.16 अब्ज मोबाईल कनेक्शन असल्याने हा नियम लागू झाल्यास त्यांच्या दैनंदिन जीवनात परिणाम होऊ शकतो.
नवीन नियमामुळे डाटा सुरक्षित राहणार का?
आरबीआयच्या या नवीन नियमाची अंमलबजावणी झाल्यानंतर ग्राहकांचा सर्वात मोठा प्रश्न आहे की फोन लॉक झाल्यानंतर त्यातील डाटा सुरक्षित राहील का? मिळालेल्या माहितीनुसार आरबीआय दोन गोष्टी निश्चित करू शकते. कर्ज वसुली टोपी व्हावी आणि ग्राहकांचा वैयक्तिक डाटा सुरक्षित राहावा. दरम्यान या नियमामुळे मोठा वाद निर्माण होऊ शकतो. कारण कर्ज देणाऱ्या कंपन्यांना नक्कीच या नियमाचा फायदा होईल. मात्र दुसरीकडे ग्राहकांचे हक्क धोक्यात येतील.
अनेक वेळा सर्वसामान्य माणूस काही अडचणीमुळे कर्ज वेळेत फेडू शकत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की घरात आजारपण, नोकरी जाणे, नैसर्गिक आपत्ती किंवा अनपेक्षित खर्च अशा अनेक कारणांमुळे आर्थिक तंगी निर्माण होऊ शकते. अशावेळी त्या व्यक्तीचा मोबाईल बंद होणे किंवा लॉक होणे म्हणजे त्याच्या आयुष्यात आणखीन एक मोठ्या संकट निर्माण होणे असंच आहे.
नवीन नियमाचा कोणाला मिळणार फायदा?
या नवीन नियमामुळे बजाज फायनान्स, डीएमआय फायनान्स, चोलामंडलम फायनान्स यासारख्या कंपन्यांना नक्कीच मोठा फायदा होऊ शकतो. कारण लहान कर्ज अनेक वेळा डिफॉल्ट होण्याची शक्यता असते. अशावेळी फोन लॉक केल्यास त्या ग्राहकाला नावीला जाणे सर्व कर्ज भरावेस लागेल. सध्या आरबीआय या विषयावर अभ्यास करत असून काही महिन्यात फेअर प्रॅक्टिसेस कोड अद्ययावत करण्याबरोबरच फोन कॉलिंग बाबत मार्गदर्शन तत्वे जारी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आरबीआयने अधिकृतपणे या नवीन नियमाबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.
फोन लॉक करून कर्ज वसूल करणे हे बँक आणि फायनान्स कंपन्यासाठी उपयोगी असू शकते. पण यामुळे सर्वसामान्य माणसांसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. कारण आज मोबाईल शिवाय कोणताच काम होणं अक्षरशा शक्यच नाही. त्यामुळे कर्ज वसुली आणि ग्राहकांचे हक्क यामध्ये समतोल राखूनच आरबीआयने अंतिम निर्णय घेतला पाहिजे. असे जर घडले नाही तर तंत्रज्ञानाच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाचे जीवन अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. आधीच कर्जात बुडालेला माणूस त्यात त्याचा मोबाईल बंद झाल्यानंतर तो पूर्णपणे हतबल झाल्याशिवाय राहणार नाही.
