Post Office Saving Schemes 2025 | नमस्कार मित्रांनो सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय बाजारामध्ये उपलब्ध आहेत. परंतु कुणी शेअर मार्केटमध्ये पैसे लावतो तर कोणी म्युचल फंडात तर कोणी फिक्स डिपॉझिट आणि आरडीमध्ये आपली कमाई जपून ठेवत आहे. पण या सगळ्या पर्यायांमध्ये सुरक्षितता आणि हमखास परताव्याचा विचार कधी केला आहे का ? तरी या सर्वान पैकी सरकारी योजनेला तोड नाही, विशेष म्हणजे पोस्ट ऑफिस मार्फत चालवल्या जाणाऱ्या अनेक योजना आज लाखो लोकांच्या बचतीचा आधार आहेत.

पोस्ट ऑफिसच्या या योजनांपैकी PPF आणि सुकन्या समृद्धी योजना त्याचबरोबर SCSS योजना तुमच्यासाठी सर्वात खास आणि सुरक्षित राहणार आहे. आज आपण अशा एका गुंतवणुकीबद्दल बोलणार आहोत ज्यात तुम्ही दररोज थोडी रक्कम वाचून तुम्ही काही वर्षानंतर कोट्यावधी रुपयांचा फंड उभा करणार आहे . एवढंच नाही तर निवृत्तीनंतर पेन्शन सारखं उत्पन्नही मिळू शकणार आहे यासाठी तुम्हाला फक्त PPF या योजनेत सातत्याने गुंतवणूक करावी लागणार आहे.
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना ! 4 लाखाच्या ठेवीवर पाच वर्षानंतर मिळणार मोठा नफा
PPF योजना म्हणजे काय ?
पब्लिक प्रायव्हेट फंड ही योजना म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी सरकारने दिलेली एक सुवर्णसंधी. ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना मानली जात आहे, कारण की या योजनेत तुम्ही 7.1% इतके खात्रीशीर परतावा मिळू शकणार आहेत. ही रक्कम पूर्णपणे करमुक्त म्हणजेच टॅक्स फ्री राहणार आहे. म्हणजेच गुंतवणूक सुरक्षित आणि परतावा नक्की त्याचबरोबर टॅक्स फ्री असल्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही.

दररोज फक्त 416 रुपये बाजूला ठेवा !
जर तुम्ही दररोज फक्त 416 रुपयांची बचत करून पब्लिक प्रायव्हेट फंड या योजनेच्या खात्यामध्ये जमा केले तर तुम्ही महिन्याला साधारणता 12,500 रुपये गुंतवले जाणार आहेत. हीच रक्कम तुम्हाला पुढील काही वर्षात आपण फायदा करून देणार आहे.
- जर तुम्ही 15 वर्षे या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख इतकी असणार आहे तर तुम्हाला व्याज मिळून ती रक्कम 41.35 लाख रुपये मिळणार आहे.
- जर 20 वर्षा या योजनेत गुंतवणूक केली तर तुमची गुंतवलेली रक्कम साधारणता तीस लाख रुपये इतकी असेल आणि तुम्हाला या योजनेचे माध्यमातून 67.69 लाख रुपयांचा फंड मिळणार आहे.
- 25 वर्षानंतर तुमची एकूण गुंतवणूक केलेली रक्कम 37.50 लाख रुपये इतकी होणार आहे . आणि तुम्हाला पंचवीस वर्षानंतर या योजनेचे माध्यमातून तब्बल 1.03 कोटी रुपये इतकी रक्कम परत मिळणार आहे.

आज ग्रामीण भागातले शेतकरी असो किंवा शहरातले नोकरदार वर्ग प्रत्येकाला भविष्याचा विचार करून बचत करावी लागत आहे. काळ कठीण आला तर हातात काहीतरी असावा हा विचार प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांच्या मनात येतो. त्यामुळे PPF सारख्या योजनेमुळे हा विश्वास अधिक बळकट होतो कारण ही योजना फक्त गुंतवणूक नाही तर निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शन सारखी एक हमी आहे.
Disclaimer |
वरील माहिती केवळ सामान्य जनजागृती साठी आहे, या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा किंवा संबंधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेचा सल्ला घ्यावा. व्याजदर व अटी सरकारनुसार वेगवेगळी बदलू शकतात या बातमी दिलेली आकडेवारी ही उपलब्ध माहितीनुसार दिलेली आहे गुंतवणुकीचा अंतिम निर्णय पूर्णपणे सल्लागारचा सल्ला घेतल्यानंतर घ्यावा.
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना ! 4 लाखाच्या ठेवीवर पाच वर्षानंतर मिळणार मोठा नफा
