Politics News : देशभरातील नागरिकांसाठी आजचा दिवस हा खूप आनंदाचा आहे. कारण भारताचा 79 वा स्वतंत्र्य दिन यंदा उत्साहात, आनंदात आणि अभिमानाने साजरा होत असताना देशवासीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी एक मोठी भेट देणार आहेत, अशी घोषणा केलेली आहे. ही भेट दिवाळी निमित्त नागरिकांना देण्यात येणार आहे आणि यामुळे आयुष्यात नवीन आशा आनंद आणि समाधान घेऊन येत आहे. पण यंदाची दिवाळी विशेष ठरणार आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केल आहे की, दिवाळीपूर्वी देशात जीएसटी मध्ये मोठा बदल होणार असून, हा बदल प्रत्येक सामान्य नागरिकांसाठी लघु आणि मध्यम उद्योगांसाठी थेट फायद्याचा ठरणार आहे. Politics News
लाल किल्ल्यावरील 79 वा स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी लाखो नागरिक टीव्ही आणि डिजिटल माध्यमांवर थेट पाहत होतो. सकाळच्या वातावरणात देशभक्तीचा सुसंगत पसरलेला असताना, नरेंद्र मोदी यांच्या भाषणांनी लोकांचे लक्ष वेधून घेतलेल आहे. 12 वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला आणि देशाला संबोधित केल. त्यांच्या भाषणामध्ये नेहमीप्रमाणे विकास, सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि सामाजिक सुधारणा यांचा उल्लेख होता. पण जेव्हा त्यांनी दिवाळीपूर्वी मोठा गिफ्ट असा उल्लेख केला तेव्हा लाखो लोकांच्या कानामध्ये एकावेळी उत्सुकतेच वातावरण निर्माण झालं.
नागरिकांसाठी दिवाळीला डबल मोठी भेट ?
नरेंद्र मोदी म्हणाले, मी यंदा तुमच्या सर्वांची दिवाळी डबल दिवाळी करणार आहे. गेल्या आठ वर्षात आपण जीएसटी मध्ये मोठी सुधारणा केल्या होत्या, देशभरातील कर प्रणाली अधिक सोपी केली. आता काळाची गरज पाहून आम्ही त्यात पुन्हा एकदा सुधारणा करत आहोत. त्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करून राज्य सरकार सोबत चर्चा केली आणि आता नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म आणत आहोत. हा बदल दिवाळीपूर्वी लागू होईल आणि तो प्रत्येक भारतीयांसाठी मोठा ठरेल. त्यांच्या या गोष्टीनंतर संपूर्ण देशभरामध्ये सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाली. नेमके काय बदल होणार? कोणत्या वस्तू स्वस्त होतील? महागाईतून दिलासा मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
Gharkul Yojana Maharashtra 2025 Apply, Best घरकुल योजना 2025 असा करा अर्ज
2017 मध्ये जीएसटी लागू झाली होता. तेव्हा भारताच्या कर व्यवस्थेला एक ऐतिहासिक टप्पा मिळाला होता. या आधी केंद्र व राज्य सरकारकडून वेगवेगळ्या नावाने अनेक कर वसूल केले जात होते जसे की व्हॅट, एक्साईज, सर्विस टॅक्स इत्यादी. त्यामुळे व्यापारात गोंधळ, कागदपत्री त्रास आणि करांचा दुहेरी भार निर्माण होत असे.
जीएसटी लागू झाल्यानंतर हे सर्व कर एकत्र करून एकसंध कर प्रणाली तयार झाली. सुरुवातीच्या काळामध्ये अनेक व्यापाऱ्यांना तांत्रिक अडचणी आल्या, पण हळूहळू व्यवस्था सुधारली. गेल्या आठ वर्षात सरकारने वेळोवेळी जीएसटी दरांमध्ये कपात केली, प्रक्रिया सुलभ केली आणि डिजिटल प्लॅटफॉर्म अधिक वापर करता सुलभ बनवला.
आता पंतप्रधान यांच्या म्हणण्यानुसार नेक्स्ट जनरेशन GST रिफॉर्म लागू होणार आहे तसेच. यामध्ये काय असेल, हे अधिकृत रित्या अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी सूत्रांच्या माहितीनुसार रोजच्या वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे थेट ग्राहकांच्या खिशाला मोठा दिलासा मिळणार आहे.
सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार नवीन जीएसटी सुधारणा लागू झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांसाठी कर कमी होतील दैनंदिन जीवनातील वस्तू जसे की खाद्यपदार्थ कपडे इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तू यावर कर सुट होऊ शकतो महागाईच्या जळा सहन करणारे कुटुंबासाठी ही बातमी निश्चित दिलासादायक ठरणार आहे. दिवाळीच्या सणानिमित्त लोक मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करतात मग ते कपडे असो किंवा घरगुती सजावटी निमित्त सामान इलेक्ट्रॉनिक्स किंवा मिठाई. कर कमी झाल्यामुळे या दरात लोकांना मोठा फायदा होईल आणि बाजारात विक्री वाढेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला ही चालना मिळेल. तर यापुढे परस्थिती कशी राहते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
(बातमी लेखन राऊंड 2 अपडेट team)

1 thought on “मोदी सरकारची मोठी घोषणा! देशभरातील नागरिकांना दिवाळीनिमित्त मिळणार मोठे गिफ्ट वाचा माहिती ”