WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पोलीस भरतीला अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रं तयार ठेवा नाहीतर पश्चात्ताप होईल! लगेच पहा संपूर्ण यादी 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Police Bharti Documents List 2025 |  पोलीस भरती म्हणजे केवळ नोकरी नाही तर अनेक तरुणांच्या आयुष्याचा एक स्वप्न आहे. आपल्या गावातल्या तालुक्यातल्या अनेक मुलांनी बालपणापासून, मी मोठा झालो की पोलीस होणार असं म्हणत खेळ खेळत असाल. आता तीच वेळ आली आहे राज्यभरात पोलीस भरती 2025 होणार आहे आणि हजारो उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत. पण अनेक तरुण केवळ कागदपत्राच्या चुकीमुळे  अपात्र ठरतात. 

हे पण वाचा : 12 वी उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी !  रेल्वेत 3,000 हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती 

Police Bharti Documents List 2025
Police Bharti Documents List 2025

आणि त्यांच्या आयुष्यातली एक मोठी संधी त्यांच्या हातामधून निघून जाते. आणि इतक्या कष्टानंतर फक्त एका कागदाच्या अभावीमुळे त्याचं स्वप्न तुटतं म्हणून आज आपण  जाणून घेणार आहोत की पोलीस भरतीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि त्यांची योग्य तयारी कशी करायची पहा संपूर्ण माहिती. 

पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे |  Police Bharti Documents List 2025

पोलीस भरतीसाठी  दहावी ,बारावी आणि त्यापुढे सर्व शिक्षणाच्या मार्कशीट आणि प्रमाणपत्र ची प्रत ठेवावी लागते परंतु काही जण दहावीची प्रमाणपत्र घेऊन जातात आणि नंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन मध्ये बाहेर पडतात.  पुढील दिलेल्या डॉक्युमेंट नुसार तुम्ही तुमची तयारी करावी आणि हे डॉक्युमेंट पोलीस भरती ला जाताना किंवा अर्ज भरताना तुमच्या सोबत ठेवावी. 

  • शैक्षणिक कागदपत्रे : दहावी, बारावी आणि त्यापुढील सर्व शिक्षणाच्या मार्कशीट आणि प्रमाणपत्राची प्रत सोबत ठेवावी. 
  • जन्म प्रमाणपत्र : जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हा तुमचा जन्म प्रमाणपत्राचा अधिकृत पुरावा म्हणून चालतो. 
  • जात प्रमाणपत्र आणि जातीचा दाखला : जर तुम्हाला राखीव प्रवर्गांमधून अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. 
Police Bharti Documents List 2025
Police Bharti Documents List 2025
  • निवास प्रमाणपत्र : ग्रामसेवक, तलाठी, किंवा तहसील कार्यालयाकडून मिळणारे रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे. 
  • आधार कार्ड , पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र | ओळखपत्र सिद्ध करण्यासाठी तुम्हाला यापैकी एक डॉक्युमेंट आवश्यक आहे. 
  • उत्पन्न प्रमाणपत्र |  आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कागदपत्र आवश्यक आहे.  
  • पासपोर्ट साईज फोटो सही  : अलीकडचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि डिजिटल सही करावी लागत आहे. 

 हे सर्व कागदपत्रे एका फाईल फोल्डरमध्ये नीट लावून ठेवावीत, अनेकदा ग्रामीण भागाचे उमेदवार शेवटच्या क्षणी गावाच्या  ऑनलाइन सेंटरमध्ये धाव घेताना दिसतात कधी एखादं प्रमाणपत्र हरवतो तर कधी जातीचा दाखला मिळण्यात विलंब होतो. 

हे पण वाचा : 12 वी उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी !  रेल्वेत 3,000 हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती 

Leave a Comment

error: Content is protected !!