October month changes : सप्टेंबर महिना आता हळूहळू संपत आला आहे अवघ्या काही दिवसांमध्ये ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अनेक नवीन बदल होतात. पण यावेळी मात्र अनेक मोठे बदल होणार आहेत, एलपीजी सिलेंडरच्या किमती पासून ते पेन्शनधारकाच्या नियमापर्यंत अनेक बदल झाले आहेत. यामध्ये सामान्य माणूस, शेतकरी ,नोकरदार, निवृत्तीवेतन देणारे, आणि ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी मोठी बातमी.
सणासुदीचा काळ जवळ आला असून स्वयंपाक घरात बजेट, प्रवासाचा खर्च, पेन्शन खात्यावरील शुल्क, आणि मोबाईल वरील UPI ट्रांजेक्शन पर्यंत या सगळ्यावर नवीन नियम लागू होणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याची सुरुवात थोडी काळजीपूर्वक करावी लागणार आहे.
सर्वप्रथम आपण LPG गॅस सिलेंडर मध्ये काय बदल होणार आहे ते पाहणार आहोत :

मागील काही महिन्यातील कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरवर बदल केले होते, परंतु 14 किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत मात्र स्थिर होती. 14 किलोच्या घरगुती क्या सिलेंडरच्या किमतीमध्ये शेवटचा बदल हा 8 एप्रिल 2025 रोजी करण्यात आला होता. त्यामुळे आता एक ऑक्टोबरला किंमत कमी होईल किंवा देईल याकडे सर्व गृहिणी आणि कुटुंबाची नजर लागलेली आहे.
रेल्वे ऑनलाईन तिकीट बुकिंग नवीन नियम :

गेल्या काही काळात ऑनलाईन तिकिटामध्ये होणाऱ्या फसवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी भारतीय रेल्वेने आता मोठा निर्णय घेतला आहे. एक ऑक्टोबर 2025 पासून आरक्षण विंडो उघडल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटात फक्त आधार परताळणी केलेल्या लोकांचं ऑनलाइन तिकीट बुक करता येणार आहे. हा नियम IRCTC या अधिकृत वेबसाईटवर आणि ॲपवर लागू करण्यात आलेले आहे, तत्काळ योजनेमध्ये आधीपासून असा नियम होता पण आता हा सर्वसाधारण आरक्षणासाठी देखील लागू करण्यात आला आहे.
पेन्शन धारकांसाठी नवीन नियम :

NPS,UPS, अटल पेन्शन योजना यामध्ये नोंदणी असलेल्या लोकांना आता नवीन शुल्करचना लागू करण्यात आली आहे. पेन्शन फंड नियमक आणि विकास प्रधिकरणाने CRAS द्वारा आकारल्या जाणाऱ्या शुल्कात बदल केला आहे. एक ऑक्टोबर पासून सरकारी कर्मचाऱ्यांना, PRAN उघडताना e – PRAN किट साठी अठरा रुपये आणि भौतिक कार्डासाठी 40 रुपये द्यावे लागणार आहेत. खाते देखभाल शुल्क दरवर्षी शंभर रुपये असणार आहे अटल पेन्शन योजना आणि NPSC Lite सदस्यांच्या बाबतीत थोडंस पशुल्क ठेवण्यात आलेले आहे.
UPI मध्ये बदल !
आजच्या काळामध्ये गुगल पे, फोन पे, किंवा इतर पेमेंट ॲपवरून प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी पेमेंट केलं जात आहे. पण नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडिया ने घेतलेल्या या नवीन निर्णयामुळे अनेकांना अडचणी येऊ शकणार आहेत. 1 ऑक्टोबर 2025 पासून यूपीआय मधील सर्वात वापरल्या जाणाऱ्या पी टू पी म्हणजेच पी आर टू पी आर व्यवहाराची सुविधा काढून टाकण्यात ची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 29 जुलै च्या परिपत्रकात याचा उल्लेख करण्यात आला होता आर्थिक फसवणूक आणि व्यवहाराची सुरक्षा वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येऊ शकतो.

एकीकडे सणासुदीचा हंगाम सुरू होतोय आणि दुसरीकडे, बाजारपेठेत सोन्या-चांदीचे दर सतत वर खाली होत आहेत. मनात गुंतवणुकीचा विचार असणाऱ्या किंवा लग्नासाठी खरेदी तयारी करणाऱ्यांनी या बदलाच्या पार्श्वभूमीवर आपला निर्णय घ्यावा. प्रत्येक महिन्याच्या पहिले तारीख नुसती कॅलेंडरची पहिली तारीख नसते तर पैशाचा हिशोब बदलणारा दिवस असतो.
बदल हा काळाचा नियम आहे, पण तयारी आपल्याला करावी लागते एलपीजी पासून तिकिटापर्यंत आणि पेन्शन पासून मोबाईल व्यवहारापर्यंत जे जे बद्दल समोर येतात त्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. घर चालवणाऱ्या गृहिणी पासून ते रोजंदारी कामगार निवृत्त आजोबापासून ते ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या तरुणापर्यंत 1 ऑक्टोबर पासून येणाऱ्या बदल सर्वांच्या आयुष्याला थेट स्पर्श करणार आहे.
