WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana: या तारखेला खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये? तुम्ही पात्र आहात का चेक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana : राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी दिला असणारे बातमी समोर आलेले आहे ती म्हणजे तुम्ही अनेक दिवसांपासून जर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर त्याचीच एक आता अपडेट आपल्या हाती लागलेली आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा आता जमा होणार आहे परंतु त्यापूर्वी काही शेतकऱ्यांना या योजनेमधून वेगळे जाणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे येथे सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी हा लेख सविस्तरपणे वाचा. Namo Shetkari Yojana

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. केंद्राच्या पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता सुमारे ९६ लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र २१ व्या हप्त्यावेळी ही संख्या घटून ९२ ते ९३ लाखांपर्यंत आली. आता नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी केवळ ९० लाख ४१ हजार २४१ शेतकरी पात्र ठरले आहेत, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे.

गाव खेड्यामध्ये यावर मोठी चर्चा सुरू आहे. अनेक शेतकरी म्हणत आहेत की आधी नियमितपणे हप्ता मिळत होता, पण अचानक नाव यादीतून गायब झालं. यामागचं मुख्य कारण म्हणजे सरकारने लागू केलेले नवे आणि कठोर निकष. या निकषांमुळे हजारो शेतकरी थेट योजनेबाहेर फेकले गेले आहेत.

यामध्ये सर्वात आधी मृत लाभार्थी वगळण्यात आले असून त्यांची संख्या सुमारे २८ हजारांपर्यंत आहे. याशिवाय दुहेरी लाभार्थी, म्हणजे एकाच व्यक्तीच्या नावावर दोन ठिकाणी लाभ घेतला जात असल्याचे प्रकार समोर आल्याने सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांची नावे कापण्यात आली आहेत. याचबरोबर आता रेशन कार्डावर आधारित नियम अधिक कडक करण्यात आला असून, एका कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे आतापर्यंत नवरा-बायको दोघांनाही हप्ता मिळणाऱ्या अनेक कुटुंबांना मोठा फटका बसला आहे.

इतकंच नाही तर ज्यांनी आयटीआर भरले आहे, जे सेवा क्षेत्रात नोकरी करतात किंवा ज्यांचं उत्पन्न ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त आहे, अशा शेतकऱ्यांचीही कसून तपासणी सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात नमो शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे नमो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता नेमका कधी येणार? सध्याची राजकीय परिस्थिती, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कालावधी लक्षात घेता, हा हप्ता डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेतकरी वर्गासाठी ही रक्कम सध्या फार महत्त्वाची आहे. रब्बी हंगाम, बियाणे, खत, मजुरी आणि वाढते खर्च पाहता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वेळेवर मिळावा, अशी अपेक्षा गावागावात व्यक्त केली जात आहे. मात्र नाव यादीत आहे की नाही, पात्रता कायम आहे का, याची खात्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली माहिती तपासून घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)

Leave a Comment