Maharashtra Ration Card Update: राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. नाशिक जिल्हा पुरवठा विभागाने काही रेशन कार्डधारकांसाठी घरपोच धान्य देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यामुळे गरजू, दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना मोठा फायदा मिळणार आहे.
स्वस्त धान्य मिळवण्यासाठी अनेकांना रेशन दुकानांवर लांबचा प्रवास करावा लागतो. विशेषत: दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना ही प्रक्रिया फारच त्रासदायक ठरते. पण आता नाशिक प्रशासनाने या समस्येवर उपाय शोधला असून पात्र नागरिकांच्या घरापर्यंतच धान्य पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली आहे.
हे पण वाचा 👉लाडकी बहिण योजनेमध्ये नवा मोठा बदल! आता लाभ घ्यायचा असेल तर E– kyc करावी लागणार आहे 👈
मिळालेल्या माहितीनुसार, या उपक्रमांतर्गत ५९४ दिव्यांग तसेच ६४३ वृद्ध नागरिकांच्या कुटुंबांना थेट घरपोच स्वस्त धान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. या सर्व लाभार्थ्यांकडे प्रशासन स्वतः जाऊन धान्य पोहोचवणार आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळताना दिसत आहे.
या उपक्रमामुळे शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न अधिक मजबूत होणार आहे. पात्रांना योग्य सुविधेचा फायदा कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळावा, यासाठी पुरवठा विभागाची ही पुढाकार खरोखर कौतुकास्पद ठरत आहे.
हे पण वाचा 👉लाडकी बहिण योजनेमध्ये नवा मोठा बदल! आता लाभ घ्यायचा असेल तर E– kyc करावी लागणार आहे 👈
यामुळे नागरिकांमध्ये समाधान तर निर्माण होईलच पण प्रशासनाबद्दलचा दृष्टिकोनदेखील सकारात्मक होण्याची शक्यता आहे. सरकारच्या योजना पात्र लोकांपर्यंत पोहोचणे हेच प्रशासनाचे प्रमुख ध्येय. आणि त्याच ध्येयाचा भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील हा उपक्रम आता प्रत्यक्षात राबवला जात आहे.
या राशन कार्डधारकांची होणार मदत :
➡ दिव्यांगांची धावपळ कमी
➡ वृद्धांना प्रवासाचा त्रास नाही
➡ वेळ वाचणार
➡ हक्काचे धान्य सुरक्षितपणे मिळणार
ही सुविधा सुरू होताच या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील हजारो कुटुंबांसाठी हा निर्णय दिलासा देणारा ठरणार असून इतर जिल्ह्यांनीही अशा पद्धतीने पुढे आलं तर अनेकांची जीवनयात्रा अधिक सुलभ होईल.
