Maharashtra Election 2025 | राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा सुरू होत असल्याचे चिन्ह दिसत आहे. अनेक दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी चार वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असून यात पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये नवा मोठा बदल! आता लाभ घ्यायचा असेल तर E– kyc करावी लागणार आहे
31 जानेवारी 2026 पर्यंत राज्याचे सर्व निवडणुका घेण्याची निर्देश कोर्टाने दिले आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाकडून तयारी जोरात सुरू आहे सूत्रांच्या माहितीनुसार या निवडणुका तीन टप्प्यात पार पडणार अशी शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 246 नगरपालिका आहे 42 नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडते. तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणूक होतील तर तिसऱ्या टप्प्यांमध्ये राज्यातील प्रमुख महानगरपालिका निवडणुका पार पडणार आहेत.

याची निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषद राज्यातील निवडणुकांची अधिकृत घोषणा होऊ शकते किंवा निवडणूक तयारीचा आढावा कसा असणार याची चर्चा होऊ शकते. निवडणुकीची घोषणा होतात राज्यभर आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे राजकीय नेत्यापासून उमेदवार पर्यंत सर्वांच्या हालचालींना गती मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरपालिका आणि पंचायत समितीसाठी मतदान नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका डिसेंबर मध्ये तर तिसऱ्या टप्प्यातील महानगरपालिकेची निवडणूक जानेवारी पर्यंत होऊ शकतात.

यादरम्यान ग्रामीण भागात आणि शहरांमध्ये या निवडणुकाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण या निवडणुकांमधूनच स्थानिक पातळीवरील सत्ता समीकरण ठरणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी होणाऱ्या या निवडणुका म्हणजेच राजकीय पक्षासाठी एक परीक्षा ठरणार आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये नवा मोठा बदल! आता लाभ घ्यायचा असेल तर E– kyc करावी लागणार आहे
