WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मोठी बातमी! LPG गॅस सिलिंडर बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; या नागरिकांना होणार मोठा फायदा..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder New Update: देशभरात सध्या एलपीजी गॅसच्या तुटवड्याची चर्चा सुरू असतानाच, केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असून, त्याचे पडसाद भारतातही दिसू लागले आहेत. मात्र अशा कठीण परिस्थितीत नागरिकांच्या चुली विझू नयेत म्हणून सरकारने ५ किलोच्या छोट्या गॅस सिलिंडरचा कोटा दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे हा निर्णय सर्वाधिक उपयोगी ठरणार आहे तो शहरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, स्थलांतरित कामगारांसाठी आणि रोजंदारीवर जगणाऱ्या मजुरांसाठी. अनेकदा मोठा १४.२ किलोचा सिलिंडर घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, अशावेळी ५ किलोचा छोटा सिलिंडर त्यांच्यासाठी मोठा आधार ठरतो. आता या सिलिंडरची उपलब्धता वाढल्यामुळे त्यांना गॅससाठी वणवण करावी लागणार नाही, अशी आशा निर्माण झाली आहे.

सरकारने यासंदर्भात सर्व राज्यांना तातडीचे आदेश दिले असून, दैनंदिन वितरण वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि तेल कंपन्यांच्या माध्यमातून ही योजना जलदगतीने राबवली जात आहे. त्यामुळे ज्या भागांमध्ये गॅसची टंचाई जाणवत होती, तिथेही आता परिस्थिती सुधारेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या निर्णयातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कागदपत्रांची अट सुलभ करण्यात आली आहे. आता ५ किलोचा सिलिंडर घेण्यासाठी पत्त्याचा पुरावा देणे आवश्यक राहणार नाही. फक्त ओळखपत्र दाखवून कोणालाही हा सिलिंडर सहज मिळू शकणार आहे. यामुळे बाहेरगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि नोकरीनिमित्त स्थलांतरित झालेल्या नागरिकांची मोठी सोय झाली आहे.

गेल्या काही दिवसांत काही राज्यांमध्ये सिलिंडरसाठी मोठी धावपळ आणि रांगा पाहायला मिळत होत्या. मात्र सरकारच्या या ‘डबल कोटा’ निर्णयामुळे ही परिस्थिती आटोक्यात येईल, अशी अपेक्षा आहे. गॅससारख्या अत्यावश्यक सेवेत कोणालाही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे.

एकूणच, जागतिक संकटाच्या छायेतही सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून घेतलेला हा निर्णय दिलासा देणारा ठरत आहे. आता तरी “चुल पेटती ठेवायची चिंता” थोडी कमी होईल, अशीच भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. LPG Gas Cylinder New Update

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment