WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी !  अर्ज प्रक्रिया सुरू ८ सप्टेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

lic recruitment 2025   |   तरुणांसाठी सुवर्णसंधी आजच्या काळामध्ये सरकारी नोकरी म्हणजे प्रत्येक तरुणाचं स्वप्न बनला आहे. गावाकडे शिक्षण घेत असलेला तरुण असो किंवा शहरातील शहरातील शिकणारा तरुण  सगळ्यांची एक स्वप्न असते  ते म्हणजे एक स्थिर सरकारी नोकरी . आता अशा सर्व तरुणांसाठी एक सुवर्णसंधी मिळाली आहे ती म्हणजे भारतीय जीवन विमा महामंडळामध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे.

या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत, ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर 2025 इतकी आहे.  एक सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी ही एक संधी निर्माण झाली आहे तरी संधी चुकली तर पुन्हा तुम्हाला पश्चाताप करावा लागणार आहे. खाली दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर लवकरात लवकर या भरतीला अर्ज करा.

या पदाकरिता होणार भरती ? 

या भरतीमध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आणि सहाय्यक अभियंता या पदासाठी जागा रिक्त झाले आहे. खालील दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत.

AAO Generalist – ३५० जागा

AAO Insurance Specialist – ३१० जागा

AAO (CA) – ३० जागा

AAO (CS) – १० जागा

AAO (Actuarial) – ३० जागा

AAO (Legal) – ३० जागा

AE Civil – ५० जागा

AE Electricl – 31 जागा 

या पदाकरिता ही भरती होणार आहे, वेगवेगळे शैक्षणिक पात्रतानुसार तरुणांना एलआयसी मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. 

 अर्ज करण्यासाठी पात्रता ? 

AAO पदासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

सहाय्यक अभियंता पदासाठी तुम्हाला BE/ B.Tech  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

अर्ज शुल्क किती असणार ? 

जनरल / OBC / EWS – 700 रुपये 

SC / ST / PWD  –  85  रुपये 

 या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार ? 

तुम्हाला या भरतीला अर्ज करण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आहे. 

सर्वप्रथम तुम्हाला ibpsonline.ibps.in/licjul25 या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे आणि यानंतर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करावे लागणार आहे. या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व तपशील योग्य भरून घ्यायची आहे. 

तुमची सर्व तपशील योग्य भरून घेतल्यानंतर शेवटी फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून अर्ज शुल्क भरल्यावर फॉर्म सबमिट करायचा आहे. यानंतर तुमचा अर्ज यशस्वी सबमिट होणार आहे.  एलआयसी मध्ये नोकरी  म्हणजे एक स्थिर आणि सरकारी नोकरी आहे ही नोकरी लागल्यानंतर संपूर्ण कुटुंबाचं कळस उजळणार आहे.  तुम्हाला या भरती करिता 8 सप्टेंबर आधी अर्ज करायचा आहे कारण की 8 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. 

Leave a Comment

error: Content is protected !!