Ladki Bahin Yojana Latest News : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठी दिलदार बातमी समोर आली आहे. भाऊबीजेच्या तोंडावर पळवणी सरकारने महिला वर्गामधील असलेली नाराजी दूर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेला राज्य सरकारने तात्पुरता दिलासा दिली आहे त्यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला असून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा माहिती सरकारला झाला होता. मात्र या योजनेअंतर्गत अनेक अपात्र महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला होता, ही गोष्ट लक्षात घेता सरकारने ई केवायसी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयामुळे महिलांमध्ये नाराजी झाली होती, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आक्षेत घेऊन महिला वर्गाचा विश्वास परत मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आले असल्याची चर्चा सुरू आहे.
लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झाली होती, 28 जून 2024 रोजी मंजुरी मिळाल्यानंतर जुलैपासून महिलांच्या खात्यात प्रत्येक महिना 1500 रुपये चा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे . ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यभरात अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलांची संख्या तब्बल दोन कोटी 56 लाख पोहोचली होती. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकी वेळी महायुती सरकारसाठी योजना मोठी गेम चेंजर ठरली होती.
अपात्र महिलांची छाननी आणि नाराजी :
सहा महिन्यापूर्वी सरकारने पात्रता निकष तपासण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या छाननीत चारचाकी वाहनधारक, अन्य शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या , शासकीय सेवेत असलेल्या किंवा एकाच कुटुंबातील अनेक लाभार्थी महिलांना किंवा एकाच कुटुंबातील अनेक लाभार्थी महिला योजनेतून वगळण्यात आले आहेत.
E kyc निर्णयामुळे झालेली भीती :

इ केवायसी प्रक्रियेत महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असल्यास त्या अपात्र ठरण्याची शक्यता होती. यात महिलाच्या वडिलांसह पतीच्या कमाईची खातर जमा केली जात होती, त्यामुळे तब्बल 70 लाख महिला अपात्र ठरवल्या जाण्याची भीती निर्माण झाली होती.
कधी मिळणार ऑक्टोबर महिन्याचा पुढील हप्ता :
सामाजिक न्याय विभागाकडून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी ४१०.३० कोटीचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. परंतु यामुळे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवानिवृत्ती भत्यासारखे इतर सामाजिक योजनेवर आर्थिक ताण येण्याची स्थिती व्यक्त केली जात आहे. शासन निर्णयानुसार योजनेसाठी एकूण 3960 कोटी तरतूद करण्यात आली आहे. लाडकी वहिनी योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पुढील काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अशा अनेक नवनवीन माहितीसाठी एक एक क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
