WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडक्या बहिणींच्या खात्यात जून महिन्याचे 1500 रुपये या तारखेला होणार जमा?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana June Installment Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आता लाखो महिलांना लागून राहिली आहे. जून महिना संपण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने यावेळी ₹1500 चा हप्ता नेमका कधी जमा होणार? याबाबत महिलांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली असून पात्र महिलांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Ladki Bahin Yojana June Installment Update

राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 ची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ सध्या राज्यातील कोट्यवधी महिला घेत आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्रितपणे जमा करण्यात आला होता. त्यानंतर मे महिन्याचा हप्ता १६ जून रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला.

जून महिन्याचे ₹1500 कधी मिळणार?

मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याचा हप्ता २८ जून ते ३० जून दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. काही तांत्रिक प्रक्रिया आणि पडताळणीमुळे विलंब झाल्यास जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते.

मात्र, याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थींनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत अपडेटची वाट पाहावी.

कोणत्या महिलांना मिळणार लाभ?

ई-केवायसी पडताळणीनंतर शासनाने मोठी छाननी मोहीम राबवली होती. या प्रक्रियेमध्ये अपात्र आणि चुकीची माहिती देणारे अनेक अर्ज बाद करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास ८० लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले असून आता केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. सध्या राज्यातील सुमारे १ कोटी ७० लाख महिला या योजनेसाठी पात्र असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता याच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

हप्ता अडकू नये यासाठी काय करावे?

अनेक महिलांचे पैसे बँक खात्यात न येण्यामागे आधार लिंक नसणे हे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे का हे एकदा नक्की तपासा. तसेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, याची खात्री करून घ्या. कारण आधार सीडिंग किंवा ई-केवायसी अपूर्ण असल्यास DBT द्वारे येणारी रक्कम खात्यात जमा होण्यास अडचणी येऊ शकतात.

हप्ता जमा झाला की नाही कसा तपासाल?

लाभार्थी महिला आपल्या मोबाईलवरून सहजपणे हप्त्याची स्थिती तपासू शकतात. यासाठी ‘नारीशक्ती दूत’ अॅपचा वापर करता येईल. तसेच योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्जाची स्थिती, बँक खात्याची माहिती आणि लाभाचा तपशील पाहता येतो.

महत्त्वाची सूचना

जर तुमच्या खात्यात अद्याप मागील हप्ता जमा झाला नसेल, तर सर्वप्रथम बँक खाते, आधार लिंक आणि ई-केवायसी स्थिती तपासा. कोणतीही अडचण असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा. दरम्यान, जून महिन्याचा ₹1500 चा हप्ता महिनाअखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता असून लाखो महिलांचे लक्ष आता पुढील अधिकृत घोषणेकडे लागले आहे.

Leave a Comment